Truck Driver Strike Saam tv
महाराष्ट्र

Truck Driver Strike: पोलीस बंदोबस्तात इंधन भरून टँकर रवाना; अनेक चालकांचा संपात सहभाग

Manmad News : हिट अँड रन या कायदा लागू करण्यात येत असल्याने ट्रक चालक आक्रमक झाले आहेत. मागील आठवड्यात या विरोधात चालक- मालक संघटनेने बंद पुकारला होता

Rajesh Sonwane


अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : मनमाडच्या पानेवाडी टर्मिनल येथील इंधन कंपनीच्या टँकर चालकांनी संप पुकारला होता. (Manmad) यामुळे काल रात्रीपासून इंधन पुरवठा ठप्प झाला होता. दरम्यान आज दुपारनंतर पोलीस (Police) बंदोबस्तात इंधन भरून टँकर रवाना करण्यात आले. (Live Marathi News)

हिट अँड रन या कायदा लागू करण्यात येत असल्याने ट्रक चालक आक्रमक झाले आहेत. मागील आठवड्यात या विरोधात चालक- मालक संघटनेने बंद पुकारला होता. यामुळे इंधन पुरवठा देखील थांबला होता. दरम्यान कायदा तूर्तास लागू न करण्याचे सरकारकडून सांगण्यात आल्यानंतर संप मागे घेण्यात आला होता. परंतु पुन्हा एकदा ट्रक चालकांनी आंदोलनाचे हत्यार उचलले आहे. यामुळे काल रात्रीपासून इंधन पुरवठा थांबला होता.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलीस बंदोबस्तात टँकर रवाना 

दरम्यान आज दुपारी वाहतूकदार व पेट्रोल पंप मालक यांची कंपनी अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली, परंतु हि बैठक निष्फळ ठरल्याने त्यांना नोटिसा देण्यात आल्या. या नंतर अखेर वाहतूकदार व पेट्रोलपंप मालकानी आपल्या गाड्या पोलीस बंदोबस्तात भरल्या असल्या तरी अनेक टँकर चालकांनी मात्र अद्याप संपात सहभागी असल्याने ४० टँकर इंधन भरून बाहेर पडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT