Malegaon News Saam tv
महाराष्ट्र

Malegaon News: मालेगावमध्ये कुत्ता गोळीची नशा; विक्री करणाऱ्यांवर कारवाई

मालेगावमध्ये कुत्ता गोळीची नशा; विक्री करणाऱ्यांवर कारवाई

साम टिव्ही ब्युरो

अजय सोनवणे

मनमाड (नाशिक) : तरुण पिढी दारु, सिगारेट, ड्रग्ज..या व्यसनाच्या जाळ्यात अडकत असतांनाच नाशिकच्या मालेगावमध्ये कुत्ता गोळीची भर पडली आहे. अनेक तरुणांना या कुत्ता गोळीचे व्यसन जडले आहे. मालेगावमध्ये ग्रामीण पोलीसांनी नुकतीच मोठी कारवाई करत कुत्ता गोळी विकणाऱ्यांचे रॅकेट उद्धवस्त केले आहे. (Letest Marathi News)

नाशिकच्या मालेगावमध्ये तरुणांमध्ये कुत्ता गोळीचे व्यसन करण्याचे मोठे प्रमाण असल्याची धक्कादायक बाब समोर आली. कुत्ता गोळीच्या नशेचे नाशिक (Nashik) शहरातही पसरू लागले आहे. मालेगावमध्ये पोलिसांनी तीन मोठ्या कारवाया करीत कुत्ता गोळीचा मोठा साठा हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी कुत्ता गोळी विक्री करणाऱ्या जुजबी कारवाई करून सोडून दिले जात होते.

साडेपाच हजार गोळ्या जप्‍त

नव्याने रुजू झालेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी तेगबिर सिंग संधू यांनी अभ्यास करून यातील आरोपींना एनडीपीएस कायद्यान्वये कारवाई केल्याने त्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहे. आतापर्यंत पोलिसांनी 5500 गोळ्या जप्त केल्या असून, दारु आणि इतर अंमली पदार्थाच्या तुलनेत कमी पैशात याची नशा करता येते. शिवाय झिंगही लगेच येत असल्याने अनेक तरुण या कुत्ता गोळीचे व्यसनाकडे वळत आहे.

मेंदूवर होतोय परिणाम

18 ते 30 वर्ष वयोगटातील तरुणांना या कुत्ता गोळीचे व्यसन जडले आहे. 15 गोळ्या 36 रुपयांना मिळतात. शिवाय याची नशा करताना कोणतीही अडचण येत नाही. अल्प्रलोजोम असं वैद्यकीय नाव असलेल्या कुत्ता गोळीच्या अतिसेवनाने शरीर बधीर होते. याशिवाय मानसिक संतुलनही त्यामुळे बिघडण्याची शक्यता असते, व्यसनी तरुण याचा वापर नशा येण्यासाठी करतात. या गोळीच्या सेवनाने थेट मेंदूवर परिणाम होतो. याच्या सेवनामुळे नशेखोर व्यक्ती आपल्याच धुंदीत राहते. त्यामुळे मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT