Manikrao Kokate News 
महाराष्ट्र

Manikrao Kokate News: कॅबिनेटमधून कोकाटे आऊट मुंडे इन? मंत्रिपदासाठी मुंडेंची दिल्ली दरबारी फिल्डिंग

Manikrao Kokate News: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंच्या अटकेचे आदेश निघाल्यानं मंत्रिपदासह आमदारकीवर टांगती तलवार आहे. त्यापार्श्वभुमीवर कोकाटेंच्या राजीनाम्यापुर्वीच धनंजय मुंडेंनी थेट दिल्ली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतलीय.

Bharat Mohalkar

Manikrao Kokate News: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंच्या अटकेचे आदेश निघाल्यानं मंत्रिपदासह आमदारकीवर टांगती तलवार आहे. त्यापार्श्वभुमीवर कोकाटेंच्या राजीनाम्यापुर्वीच धनंजय मुंडेंनी थेट दिल्ली गाठत मंत्रिपदासाठी भाजपच्या वरीष्ठांकडे फिल्डिंग लावायला सुरुवात केलीय. धनंजय मुंडेंनी दिल्ली दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली आहे. याच भेटीत धनंजय मुंडेंनी मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा आता रंगली आहे.

खरंतर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचं नाव आल्यानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला. एवढंच नाही तर ऑफिस ऑफ प्रॉफिटसह कृषी घोटाळा, जिल्हा नियोजन विभागाच्या निधीचा घोटाळा, असे अनेक गंभीर आरोपांमुळे मुंडे अडचणीत आले होते. यानंतर मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ते विजनवासात गेले.

मात्र गेल्या काही महिन्यात मुंडे पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झालेत.एवढंच नाही तर विधीमंडळात रमी खेळल्याप्रकरणी कोकाटेंच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कोकाटेंच्या रुपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसलाय. मात्र संकटात संधी शोधत मुंडेंनी दिल्लीत धडक दिलीय.

आता मुंडेंचा दिल्ली दौरा पुर्वनियोजित होता की मंत्रिपदासाठी त्यांनी लॉबिंग सुरु केलंय. याचीच चर्चा रंगलीय त्यामुळे कोकाटेंचं मंत्रिपद गेल्यास धनंजय मुंडेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार की मुंडेंना डावलून नव्या नेत्याला संधी मिळणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: गुहागरच्या बुधल बीचवर चिपळूणच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT