Manchar Crime News Saam TV
महाराष्ट्र

Manchar Crime News: मंचरमध्ये ज्वेलरी शॉपवर दरोडा; पोलिसांनी सिनेस्टाइलने ५ जणांना केली अटक

Manchar Robbery On Gold Shop: चर शहरातील जागरुक नागरिकांच्या सतर्कतेमुळे या चोरट्यांचा डाव फसला आहे.

साम टिव्ही ब्युरो

रोहिदास गाडगे

Manchar Crime News:

ऐन सनासुदीच्या तोंडावर मंचर शहरात मध्यरात्रीच सात जणांच्या टोळीने ज्वेलर्सवर सिनेस्टाइल दरोडा टाकलाय. नागरिक आणि मंचर पोलीसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय. यावेळी दरोडा टाकुन पळुन जाणाऱ्या पाच जणांच्या टोळीला मुद्देमालासह अटक केलीये.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मंचर शहरातील उत्तमभाग्य ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात मध्यरात्री ७ तरुणांकडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन चोरटे पळून जाण्याच्या तयारी होते. त्यावेळी मंचर शहरातील जागरुक नागरिकांच्या सतर्कतेमुळे या चोरट्यांचा डाव फसला आहे.

चोरट्यांची टोळी दुकानात आणि घरामध्ये असताना स्थानिक नागरिकांच्या मदतीने मंचर पोलीसांनी सिनेस्टाइलने सापळा रचला. सापळा रचून पोलिसांनी ५ जणांच्या मुसक्या आवळल्यात. मात्र यातून दोघांना पळून जाण्यात यश आलं आहे. अटक करण्यात आलेल्या पाच दरोडेखोरांकडून १८ किलो ७१० ग्राम चांदी, ०२ लाख २२ हजार रोकड आणि ०५ तोळे सोन्याचा समावेश आहे.

चोरट्यांकडून कोयते, गॅस कटरसह इतर हत्यारे देखील हस्तगत करण्यात आली आहेत. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. खेड विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT