Maratha Aarkshan News | Manoj Jarange Andolan Journey Till Now Saam TV
महाराष्ट्र

Maratha Aarkshan Journey: 175 दिवसांचा संघर्ष, मराठा आरक्षणासाठी आज निर्णायक दिवस; कसा आहे मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा इथपर्यंतचा प्रवास?

प्रविण वाकचौरे

Manoj Jarange Andolan Journey:

मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला. सहा महिन्यांच्या अथक प्रवासानंतर मराठा बांधवांसाठी आज महत्वाचा दिवस आहे. सहा महिन्यात तीन वेळा आमरण उपोषण, अंतरवाली सराटी ते नवी मुंबई अशी पायपीट असे अनेक टप्पे मनोज जरांगे यांच्या आंदोलनचे आहेत.

या दरम्यान  मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे, छगन भुजबळ, नारायण राणे अशा दिग्गज नेत्यांवर थेट टीका करत अंगावर घेतलं. मराठा समाजासाठी मनोज जरांगे यांनी कुठलीही तडजोड केली नाही. जिथे आक्रमक भूमिका घेता येईल तिथे त्यांनी ती भूमिका घेतली.

आज मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं आहे. मराठा आंदोलन ज्यासाठी उभं राहिलं, त्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. आता याचं कायद्यात रुपांतर झालं पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे. मनोज जरांगे यांच्या १७५ दिवसांच्या आंदोलनासाठी आज महत्त्वाचा दिवस आहेत.

कसा आहे इथपर्यंतचा प्रवास?

29 ऑगस्ट : मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू

30 ऑगस्ट : जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, तत्कालीन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे यांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा

1 सप्टेंबर : अंतरवाली सराटी येथे पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये बाचाबाची, पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीमार करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. लाठीमाराच्या घटनेनंतर राज्यभर आंदोलन पेटलं ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

2 सप्टेंबर : राज्यात विविध ठिकाणी रास्ता रोको. अनेक नेते मनोज जरांगे यांच्या भेटीला

3 सप्टेंबर : सरकारकडून मंत्री गिरीश महाजन, आमदार नितेश राणे अंतरवाली सराटीमध्ये दाखल. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं.

4 सप्टेंबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पुरुषोत्तम खेडेकर, रेखा खडेकर, खासदार इम्तियाज जलील भेटीला. अर्जुन खोतकर यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्र्यांचे जरांगेंशी बोलणे

6 सप्टेंबर : लाठीमार प्रकरणाची चौकशी करणारे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी घेतली भेट. निजामकालीन नोंदीनुसार कुणबी दाखले देण्याची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

7 सप्टेंबर : अध्यादेशातील वंशावळ शब्द वगळण्याची जरांगेंची मागणी. जरांगेंचे शिष्टमंडळ चर्चेसाठी मुंबईला पोहोचल्यानंतर रात्री उशिरापर्यंत मुंबईत मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांसोबत शिष्टमंडळाशी चर्चा

9 सप्टेंबर : अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे दुसऱ्या अध्यादेशासह आंदोलनस्थळी

10 सप्टेंबर : पडताळणी नको, मराठा नोंद असणाऱ्यांना थेट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, मनोज जरांगेंची भूमिका

11 सप्टेंबर : आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा मुंबईत सर्वपक्षीय ठराव

12 सप्टेंबर : मुख्यमंत्री आल्यास उपोषण सोडण्याची जरांगेंनी तयारी दर्शवली. सरकारला एक महिन्याचा वेळ. अपर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव निलंबित

14 सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मंत्री अचानक सकाळी ११ वाजता अंतरवाली सराटी येथे दाखल. चर्चेनंतर जरांगेंनी उपोषण सोडले

22 सप्टेंबर : चर्चेअंती शासकीय शिष्टमंडळास दोन महिन्यांचा कालावधी

1 ऑक्टोबर : संपूर्ण राज्यात पाच टप्प्यांत जरांगे यांचा दौरा सुरू

14 ऑक्टोबर : पहिली राज्यव्यापी सभा अंतरवाली सराटीत

22 ऑक्टोबर : राजकीय नेत्यांना २५ ऑक्टोबरपासून गावबंदीची घोषणा

25 ऑक्टोबर : उपोषणाचा दुसरा टप्पा सुरू. गावागावांत साखळी उपोषण आणि बेमुदत उपोषण

2 डिसेंबर : जालन्यात विराट सभा, 23 डिसेंबर बीड येथे इशारा सभेची घोषणा

23 डिसेंबर: बीडच्या सभेत २० जानेवारी रोजी मुंबईला जाणार असल्याची जरांगेंची घोषणा

20 जानेवारी : सकाळी ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे रवाना

26 जानेवारी : नवी मुंबई वाशी येथे दाखल.

27 जानेवारी : वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती मराठा आरक्षण संदर्भात अधिसूचना

10 फेब्रुवारी : अधिसूचनांच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगेचे पुन्हा उपोषण सुरु

16 फेब्रुवारी : मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची घोषणा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT