Yavatmal Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Crime News : पाठीत खुपसलेल्या चाकूसह पाेहाेचला रुग्णालयात; हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल

Yavatmal News : हा थरार यवतमाळच्या लाेहारा येथील शिवाजीनगर परिसरात घडला आहे.

Shivani Tichkule

संजय राठोड

Yavatmal Crime News : यवतमाळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्सवाचे फलक लावण्यावरून ४ जणांमध्ये जोरदार वाद सुरु होता. इतकेच नव्हे तर हे फलक फाडून शेजाऱ्याला शिवीगाळ सुरू केली. बाहेर नेमकं काय सुरु आहे हे पाहण्यासाठी घराबाहेर आलेल्या युवकावर एकाने चाकूने हल्ला केला. (Latest Marathi News)

पाठीत चाकू खुपसातच त्या युवकाने चाकू हाताने घट्ट पकडून ठेवला. त्यामुळे हल्लेखाेराला दुसरा वार करण्याची संधी मिळाली नाही. तेवढ्यात कुटुंबातील इतर सदस्य धावून आले, त्यांनी जखमीला चाकूसह थेट शासकीय रुग्णालयात दाखल केले. हा थरार यवतमाळच्या (Yavatmal) लाेहारा येथील शिवाजीनगर परिसरात घडला आहे. (Crime News)

दीक्षित विजय हिरणवाडे (३८, रा. रामनगर लाेहारा) असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. जखमी दीक्षितला तातडीने दुचाकीवरून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पाठीच्या खालच्या भागात चाकू रुतला आहे. ताे बाहेर काढण्यासाठी डाॅक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेला सुरुवात केली. या प्रकरणात चाैघांवर संशय व्यक्त केला जात असून, घटनेचा व्हिडिओ व्हायरला होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्याचे ग्राम दैवत कसबा गणपती मंदिरात चोरट्यांचा डल्ला

लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी! ₹१५०० 'या' दिवशी खात्यात जमा होणार? आजच्या बैठकीत सप्टेंबर हप्त्याबाबत निर्णय?

Rajya Sabha Election : मोठी अपडेट! आणखी २ मंत्री बाहेर पडणार, ४ नव्या चेहऱ्यांना संधी; PM मोदींच्या नव्या टीममध्ये कोण?

Heart Attack : नवरात्रीत गरबा खेळताना 'ही' ५ लक्षणे दिसली तर लगेच थांबा! हार्ट अटॅकचा असू शकतो धोका

दुसऱ्यांच्या घरी पितरांचे जेवण करणं शुभ की अशुभ? श्राद्ध भोजनाने दोष लागतो का?

SCROLL FOR NEXT