nagpur news  Saam tv
महाराष्ट्र

पत्नीने लेकीचा ताबा मागितला; रागाच्या भरात नवऱ्याने ८ वर्षीय मुलीला संपवलं, नागपुरात खळबळ

nagpur crime news : नागपुरात रागाच्या भरात नवऱ्याने ८ वर्षीय मुलीला संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

नागपुरात घडली धक्कादायक घटना

पत्नीने मुलीचा ताबा मागितल्याने नवरा भडकला

नवऱ्याने पोटच्या मुलीला संपवलं

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरात वेगळ्या राहणाऱ्या पत्नीने मुलीचा ताबा मागितला. त्यानंतर रागाच्या भरात नवऱ्याने ८ वर्षांच्या मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरातील वाठोड्यातील सरोदेनगर परिसरात बुधवारी पहाटे खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नराधम शेखरला त्याच्या ८ वर्षीय मुलीने बुधवारी पहाटने साडेपाचच्या सुमारास पाणी प्यायला मागितलं. त्यानंतर दारूच्या नशेत असलेल्या शेखरने रागाच्या भरात मुलीच्या छातीत चाकू खुपसला. धनश्री शेंदरे असं मृत मुलीचं नाव आहे.

धनश्री ही नागपूरच्या वाठोड्यातील सरोदेनगर भागात आजी आणि वडिलांसोबत राहत होती. शेखरचा पत्नी शुभांगीसोबत मुलीच्या ताब्यावरून दीर्घकाळ वाद सुरू होता. पत्नी ही मुलीला आईकडे देण्याच्या मागणीवर ठाम होती. त्याला शेखरचा तीव्र विरोध होता.

बायकोच्या मागणीने रागाच्या भरात शेखरने मुलीच्या छातीत चाकू खुपसला. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली धनश्री मदतीसाठी रडत होती. यानंतर आजी आणि काकांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर मुलीला मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

डॉक्टरांनी आठ वर्षीय धनश्रीला मृत घोषित केले. कुसुमबाई शेंदरे यांच्या तक्रारीवरून वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शेखर शेंदरेला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी दारूच्या आहारी, पत्नीवर संशय आणि मारहाण करत होता. पत्नी वेगळी राहत होती. पत्नी मुलीला भेटण्यासाठी लपून यायची. मुलीची आईकडे जाण्याची ओढ आरोपीसाठी वादाचे कारण ठरले. या घटनेने संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election: भाजपमध्ये गेलेल्या २ अपक्ष नेत्यांची आमदारकी जाणार; काय आहे नियम? PK च्या पक्षाकडून तक्रारीनंतर चर्चेला उधाण

Weight Loss Diet Tips: वजन कमी करण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे जाणून घ्या

‘५०० कोटीनंतर आणखी ४ बॉम्ब टाकणार’; अनेकांची नावं उघड करणार,मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

5 Crispy Chakli Recipe For Diwali: दिवाळीसाठी बनवा ५ प्रकारच्या खमंग आणि कुरकुरीत चकल्या! वाचा सोप्या रेसिपीज

सिग्नलशी छेडछाड अन् महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये दरोडा! नेमकं काय घडलं? पाहा Special Report

SCROLL FOR NEXT