akola news, minor boy, molested case, akola court order
akola news, minor boy, molested case, akola court order saam tv
महाराष्ट्र

Akola News : मोबाइलच्या बहाण्याने अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, युवकास दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

जयेश गावंडे

Akola Latest News : एका बारावर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्यास जिल्हा व सत्र न्यायालयाने (akola court) दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच आरोपीस दंडही ठोठावण्यात आला आहे. तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे. (Maharashtra News)

सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गुडधी येथील रहिवासी ओम धोटे याने हे कृत्य केले हाेते. एका गावातील रहिवासी बारा वर्षीय मुलाला मोबाइलमधील (mobile) गेम दाखविण्याच्या बहाण्याने धाेटे याने मुलास निर्जन स्थळी नेले.

तेथे मुलावर धाेटे याने अनैसर्गिक अत्याचार (minor boy molested) केला. याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी (civil lines police akola) अनैसर्गिक अत्याचार, पोस्को कायद्याची विविध कलमे व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये धाेटेवर गुन्हा दाखल केला हाेता.

त्यानंतर या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने पाच साक्षीदार तपासल्यानंतर आढळलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे आरोपीस दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Constituency : पुणे शहरातील 13 दुय्यम निबंधक कार्यालये दोन दिवस राहणार बंद, जाणून घ्या कारण

Buldhana Water Crisis: बुलढाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा... ४६ गावांमध्ये ४७ टँकर सुरू; पाण्यासाठी नागरिकांची वणवण

Nagpur Earthquake : नागपूर शहरात भूकंपाचे सौम्य धक्के, रिश्टर स्केलवर २.५ इतकी तीव्रता; नागरिकांमध्ये घबराट

उदयनराजे भाेसलेंसाठी अजित पवार, देवेंद्र फडणवीस साता-यात; शशिकांत शिंदेंसाठी शरद पवार आज पुन्हा पावसातील सभेच्या मैदानावरुन काेणती साद घालणार?

Lok Sabha 2024 : मविआ आणि महायुतीच्या ४ प्रमुख उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या नोटीसा; ४८ तासात हिशेब देण्याची सूचना

SCROLL FOR NEXT