Malshej Ghat Closed साम टीव्ही मराठी
महाराष्ट्र

Malshej Ghat Closed : माळशेज घाट वाहतुकीसाठी आजही बंद; पर्यटकांचे अतोनात हाल, पर्यायी मार्ग कोणते?

Malshej Ghat closed due to heavy rainfall : मुसळधार पाऊस आणि दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे माळशेज घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पर्यटकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

Namdeo Kumbhar

रोहिदास घाडगे, शिरूर प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Malshej Ghat Closed Due to Heavy Rain : प्रसिद्ध पर्यटनाचे केंद्र आणि मुख्य वाहतुकीचा मार्ग असलेला माळशेज घाट मुसळधार पाऊस आणि दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला असून घाटाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पावसामुळे रस्त्यावर दगड आणि माती आल्याने वाहनधारकांनी या मार्गावरून प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कल्याण–अहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाट वाहतुकीसाठी बंद असतानाही पर्यटकांची गर्दी कायम आहे. पर्यायी मार्गावरील वाहतूक कोंडी, प्रशासनाचे नियोजन आणि पोलिसांच्या भूमिकेवर स्थानिक नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. माळशेज घाट मार्ग बंद असल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. मात्र, खिरेश्वर परिसरात रात्रभर पर्यटकांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या कोंडीत रुग्णांसह अनेक पर्यटक तासन तास अडकून पडल्याने त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

पोलिसांकडून स्थानिक वाहनांना अडवले जात असतानाच, काही अवजड वाहनांना पैशांच्या बदल्यात सोडले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. प्रशासनाच्या अपुऱ्या नियोजनामुळे पर्यटकांचे हाल होत असून, पर्यटन हंगामात घाट मार्ग बंद ठेवल्याने स्थानिक व्यावसायिकांनाही आर्थिक फटका बसत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

माळशेज घाट बंद, पर्यायी मार्ग कोणता?

मुंबईकडे जाणारी वाहने

आळेफाटा → राजगुरूनगर → चाकण → तळेगाव MIDC → लोणावळा → मुंबई

आहिल्यानगर/नाशिककडून मुंबईकडे जाणारी वाहने

आळेफाटा → संगमनेर → नाशिक → कसारा → कल्याण → मुंबई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्याच्या मुळशीतील लवळे फाट्याजवळ भीषण अपघात

महाराष्ट्र भूकंपाने हादरला! सकाळ सकाळी ३ जिल्ह्यांमध्ये जाणवले हादरे; शाळेतून पोरांना बाहेर काढले, नागरिकांची पळापळ

Mangalsutra For Woman: साडी असो वा वेस्टर्न आऊटफिट; महिलांसाठी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स, शोभून दिसतील

Navratri 2026 Start Date: प्रतिपदा, घटस्थापना कधी? दसरा कोणत्या दिवशी? तारीख आणि शुभ मुहूर्त लगेचच घ्या जाणून

Dark Circle: डोळ्यांभोवती काळी वर्तुळं वाढलीयेत का? ही आहेत खरी कारणं

SCROLL FOR NEXT