Nandurbar: मालेगाव-सुरत बसची मोटरसायकलला धडक; एकाचा मृत्यू!  दिनू गावित
महाराष्ट्र

Nandurbar: मालेगाव-सुरत बसची मोटरसायकलला धडक; एकाचा मृत्यू!

नवापूर- पिंपळनेर रस्त्यावर मालेगाव सुरत बस व मोटरसायकली यांंच्यात अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

दिनू गावित

दिनू गावित

नंदुरबार : नवापूर- पिंपळनेर रस्त्यावर मालेगाव सुरत बस व मोटरसायकली यांंच्यात अपघात Accident झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नंदुरबार Nandurbar जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

हे देखील पहा-

नवापुर तालुक्यातील घोड जामन्या गाव नजीक गुजरात डेपोची मालेगाव-सुरत बस क्रमांक जी जे १८ झेड ५६५० या अॅपे रिक्षाला ओव्हरटेक  करताना समोरून येणार मोटरसायकल क्रमांक एम.एच ३९ ए जी  ७०६३ ला जोरदार धडक दिल्याने मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला फेकली गेली.

मोटारसायकलीखाली तिघे दाबले जावून त्यावर पुन्हा बस आदळली. मोटरसायकलच्या खाली तिघे आणि मोटारसायकलवर बसचे चाक असा गंभीर प्रसंग ओढवला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. कोट्या मौल्या मावची (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला तर विक्रम श्रीराम मावची (वय  ५०) हे गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा झामणझर येथील आहे. तिसऱ्याची ओळख पटली नसून गुजरात राज्यातील सोनगड तालुक्यातील गोंदा गावातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SBI Stree Shakti Scheme: लाडक्या बहिणींना मिळणार २ कोटींचं कर्ज; व्यवसाय सुरू करण्यासाठी SBI ची खास ऑफर

डिलिमिटेशसाठी ठाकरेंविरोधात FIRचा कट, सह्याद्री अतिथीगृहावर ठरली FIRची स्क्रिप्ट, दिशा सालियन मृत्यू प्रकरणी राऊतांचा मोठा आरोप

Maharashtra News Live Update: अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा; राजकीय वातावरण तापणार?

NEET पेपरफुटीचा देखावा ठरतोय लक्षवेधी; कल्याणच्या ‘नेतिवलीच्या राजा’च्या दर्शनासाठी गणेशभक्तांची गर्दी

सर्कलवरचा हत्ती दाखवा अन् बक्षीस मिळवा! चमकोगिरीमुळे महत्त्वाचा लँडमार्कच अदृश्य

SCROLL FOR NEXT