sharad pawar ajit pawar ncp x
महाराष्ट्र

Sharad Pawar vs Ajit Pawar: माळेगावच्या रिंगणात पवारविरूद्ध पवार; शरद पवारांनी दादांवर तोफ डागली

Ajit Pawar vs Sharad Pawar: विधानसभेनंतर बारामतीत आता पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार संघर्ष रंगलाय. मात्र हा संघर्ष का पेटलाय? त्याची नेमकी कारणं काय आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Bharat Mohalkar

राष्ट्रवादीच्या मनोमिलनाबाबतच्या चर्चांना ब्रेक लावून पवारांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली.. त्यानंतर आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पवारांनी थेट अजित पवारांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करत खोचक टोला लगावलाय.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा काका-पुतण्या आमने-सामने आलेत. शरद पवार, अजित पवार, भाजपचे चंद्रराव तावरे आणि इतर अशी 4 पॅनल निवडणुकीच्या मैदानात आहेत.. तर अजित पवारांनी ब वर्ग गटातून उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक प्रतिष्ठेची केलीय.. मात्र या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय आहे? पाहूयात.

माळेगाव कारखान्यावर पवारांचं वर्चस्व

कारखान्याचे 19 हजार सभासद

2017 मध्ये तावरेंकडून अजित पवारांच्या पॅनलचा पराभव

इंदापूरच्या छत्रपती सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीने थेट निवडणूक न लढवता अजित पवारांना पाठींबा दिला होता. त्यामुळे माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीतही सहकाराची भूमिका घेण्याची पवारांच्या राष्ट्रवादीची अपेक्षा होती. मात्र अजित पवारांनी थेट प्रचाराला सुरुवात केल्यानं पवारांची राष्ट्रवादीही मैदानात उतरलीय. त्यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकून पवार बालेकिल्ला मजबूत करणार की अजित पवार कारखान्यावर वर्चस्व मिळवणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

उज्ज्वला थिटेंना धक्का, अनगरचा नगराध्यक्ष ठरला; जिल्हा न्यायालयानं नेमका निकाल काय दिला? VIDEO

India Tourism : काश्मीर-मनाली नाही; गुलाबी थंडीत आवर्जून फिरा 'हे' ठिकाण, जोडीदार होईल खुश

Blouse Fitting Tips: पहिल्यांदा ब्लाउज शिवायला देताय? मग परफेक्ट फिटींगसाठी लक्षात ठेवा या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT