Samruddhi Mahamarg Accident News Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: चालकाला डुलकी लागली अन् अनर्थ घडला; समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर शनिवारी दुपारच्या सुमारास भयानक अपघात झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मनोज जयस्वाल, साम टीव्ही

Samruddhi Mahamarg Accident News: विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघातांचं प्रमाण काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. समृद्धी महामार्गावर शनिवारी दुपारच्या सुमारास भयानक अपघात झाला आहे.

मुंबईहून नागपूरकडे (Mumbai To Nagpur) भरधाव वेगात निघालेल्या ट्रकवरील अचानक चालकाचे नियंत्रण सुटले. क्षणात ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. या भीषण अपघातात ट्रकचालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले आहेत.

थरकाप उडवणारी ही घटना वाशिमच्या (Washim News) कारंजा टोलनाक्याजवळ घडली. खुर्चीद अन्सारी (वय 26 वर्ष) आणि कुदुस अन्सारी (वय 23 वर्ष, दोघेही रा मुंबई) अशी जखमी झालेल्या ट्रकचालक आणि क्लिनरची नावे आहेत.

अपघाताची माहिती मिळताच समृद्धी हायवे (Samruddhi Mahamarg Accident) लोकेशन अग्निशामक दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघाग्रस्त ट्रकमध्ये ऑईलच्या कॅन असल्यामुळे ट्रक पेट घेण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

पण समृद्धी हायवे लोकेशन अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या ट्रकचालक आणि क्लिनरला तातडीने उपचारासाठी कारंजा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

kartarpur sahibला शीखांव्यतिरिक्त कोण जाऊ शकते, त्यासाठी किती फी भरावी लागेल?

Sara Tendulkar: भारत पाकिस्तान क्रिकेट साामन्यावरुन सुचलंय सचिन तेंडुलकरच्या लेकीचं नाव; 'सारा'च्या नावाचा अर्थ काय?

Maharashtra News Live Updates: मुंबई नाशिक महामार्गावरील दोन्ही मार्गावरील वाहतूक मंदावली

Washim Bajar Samiti : आठवडाभरातच सव्वा लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक; वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीतील स्थिती

SCROLL FOR NEXT