Eknath Shinde, Manojkumar Shinde Saam TV Marathi
महाराष्ट्र

Eknath Shinde : शिवसेनेला खिंडार! एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का, नाराज नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

Eknath Shinde, Manojkumar Shinde : रायगडमध्ये एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून माजी रोहा तालुकाप्रमुख मनोजकुमार शिंदे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Namdeo Kumbhar

सचिन कदम, रायगड प्रतिनिधी

Manojkumar Shinde joins NCP in Raigad : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत रायगडच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडवून आणली आहे. तटकरे यांनी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला (शिंदे गट) जोरदार धक्का दिला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी रोहा तालुकाप्रमुख मनोजकुमार शिंदे यांनी आज शेकडो सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. खासदार सुनील तटकरे आणि मनोजकुमार शिंदे हे आजवरचे कट्टर राजकीय विरोधक मानले जात असल्याने, या पक्षप्रवेशाने रायगडच्या राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नेमकी नाराजी कशामुळे होती?

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर मनोजकुमार शिंदे यांना अचानक शिवसेना तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पक्षनेतृत्वाच्या या निर्णयानंतर शिंदे आणि त्यांचे समर्थक कमालीचे नाराज होते. गेल्या काही काळापासून ते पक्षात सक्रिय नव्हते आणि त्यांच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. अखेर आज खासदार तटकरे यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत त्यांनी राष्ट्रवादीची घड्याळ हातावर बांधली.

मी बदललोय, हा तुमचा जो काही आरोप आहे, किंवा तुम्ही जे बोलताय, पण मी त्यासाठी बदललेलो नाहीये. परिस्थितीने बदलवलेलं आहे. जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, ज्याने रोह्यामध्ये शून्यातून शिवसेना उभी केली आणि वटवृक्षासारखी शिवसेना उभी केली, आणि त्याला ज्यावेळेला बाहेर काढलं जातं. बेधडक आरोप करून. त्यावेळेला शेवटी काय, मनाची परिस्थिती बदलावीच लागते आणि त्याप्रमाणे मी बदललोय. असं काय बदलायसाठी काय विशेष नाही.
मनोजकुमार शिंदे

रोह्यातील राजकीय समीकरणे बदलणार!

मनोजकुमार शिंदे हे रोहा तालुक्यातील एक ताकदवान नेते म्हणून ओळखले जातात. सुनील तटकरे यांचे कट्टर विरोधक अशीच त्यांची आजवरची ओळख होती. मात्र, आता हे दोन मोठे नेते एकत्र आल्यामुळे रोहा आणि पर्यायाने संपूर्ण रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Farmer Loan : राज्य सरकारचा मोठा निर्णय! शेतकरी कर्जमाफी लांबणीवर; आता कधी होणार कर्जमाफी? वाचा

पालकांनी मुलांसमोर भांडणे योग्य आहे का?

Chatrapati Sambhajinagar: ७ महिन्यांच्या चिमुकल्याने गिळले काचेचे तुकडे; संभाजीनगरमधील धक्कादायक घटना, डॉक्टरांनी असा वाचवला जीव

EPFO Update: PF खात्यावर ८.२५ टक्के व्याज जमा होण्यास सुरूवात, तुम्हाला मिळाले का? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

Lock Upp 2: बंदूक घेऊन 'लॉक अप २'मध्ये आला गोविंदा; सुनीता आहुजाला म्हणाला, 'आता माझ्या छातीत गोळी...'

SCROLL FOR NEXT