Solapur fake disability certificate scam Saam TV AI
महाराष्ट्र

सरकारी रुग्णालयात मोठा घोटाळा! बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात बड्या वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

Solapur Scam, Fake Disability Certificate : सोलापूर शासकीय रुग्णालयातील कथित बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

विश्वभुषण लिमये

Solapur fake disability certificate scam : सोलापूर शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग (अपंगत्व) प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची व्याप्ती आता अधिकच वाढली आहे. आंतरजिल्हा रॅकेटचा पर्दाफाश करत सोलापूर शहर गुन्हे शाखेने थेट शासकीय रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यासह (RMO) आठ जणांना अटक केली आहे.

सोलापूर, अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्ह्यांपर्यंत या घोटाळ्याचे थेट कनेक्शन पसरल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एक सेल्समन एजंट हा या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचे तपासातून उघड झालेय. सरकारी नोकरी नियमित करण्यासाठी काही कर्मचाऱ्यांनी बनावट आधार कार्डच्या आधारे अपंगत्व प्रमाणपत्रे लाटल्याचा आरोप आहे. सामाजिक संघटनेच्या तक्रारीनंतर स्थापन केलेल्या चौकशी समितीच्या अहवालानुसार शहर पोलिसांत फिर्याद नोंदवण्यात आली होती. त्यानंतर आता धागेदोरे ३ जिल्ह्यांपर्यंत पोहचेल आहेत. या प्रकरणात पोलिसांनी थेट सरकारी डॉक्टरालाच बेड्या ठोकल्या आहेत.

निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कनाके, राजेश भाऊसाहेब जाधव, महेश दिनकर बारगजे, राजेश रमाकांत ढवण, विजय बाळासाहेब गर्जे, अरुण रामदास शिंपी, वसीम शौकत खान, सागर गोविंद रजपूत असे अटक केलेल्या ८ आरोपींची नावे आहेत. मागील दीड वर्षाच्या कालावधीत वितरित झालेल्या आठ प्रमाणपत्र पोलिसांच्या रडारवर होती. तज्ञांची तपासणी न करता प्रमाणपत्र वितरित केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

दिव्यांग प्रमाणपत्रासाठी शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांचा ओटीपी लागतो. तो ओटीपीसाठी डॉ. कणके यांनी फोन करून मिळवला. त्यानंतर प्रमाणपत्र काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी याची माहिती दिली आहे. ते या प्रकरणाचा तपास करत असून यात आणखी किती दूर धागेदोरे जातात, हे काही दिवसांतच स्पष्ट होईल. या घोटाळ्यामुळे सोलापूर आणि राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT