police transfers  saam tv
महाराष्ट्र

Police Inspector Transfer: राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल, महाराष्ट्रातील ४४९ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल, महाराष्ट्रातील ४४९ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

साम टिव्ही ब्युरो

Police Inspector Transfer: एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेत राज्यातील ४४९ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.

शिंदे सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर राज्यात विविध विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यातच आज ४४९ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

यात काही असे पोलीस अधिकारी आहेत, ज्यांनी बदल्यासाठी विनंती अर्ज केला होता. अनेक महिन्यांपासून हे अधिकारी बदल्यांच्या प्रतिक्षेत होते. अखेर त्यांची विनंती मान्य करत बदल्या करण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)

पोलिस विभागाने जारी केलेल्या पत्रकानुसार, मुदत पूर्ण झालेल्या ३३६ आणि विनंतीनुसार ११३ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या आज करण्यात आल्या. अशा एकूण ४४९ पोलिस निरीक्षांच्या बदल्या पोलिस विभागाने केल्या आहेत

याआधी राज्य सरकारने 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. यातच प्रसिद्ध सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचाही समावेश होता. त्यांची मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : 'हे' ४ पदार्थ रक्तवाहिन्या ब्लॉक करतात, हार्ट अटॅकचा धोका वाढवतात; आजपासूनच खाणे टाळा

Rain Alert : पाऊस झोडपणार! १५ राज्यांना सतर्कतेचा इशारा, महाराष्ट्रात कसा असेल पाऊस? जाणून घ्या अंदाज

Accident : मध्यरात्री घडला काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, महामार्गावर ४ जणांचा जागीच अंत, २० जखमी

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर : आगीतून वाचवले; पण जुळ्या चिमुकल्यांना नियतीने हिरावले

Zodiac Personality Traits: ४ राशींच्या व्यक्तींकडे असतो पैसाच पैसा; कुबेरासारखं असतं नशीब, कधीच येत नाही आर्थिक चणचण

SCROLL FOR NEXT