Major Accident Mumbai Nashik Highway truck hits Jeep 6 passengers dead 9 injured near bhiwandi Saam TV
महाराष्ट्र

Bhiwandi Accident News: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने काळी पिवळीला उडवलं; ६ जणांचा जागीच मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

फैयाज शेख, साम टीव्ही

Mumbai Nashik Highway Accident News: ठाणे जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील ट्रक आणि काळी पिवळीचा भीषण अपघात झाला. खडवली फाट्याजवळ रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने काळी पिवळीला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ६ जण जखमी झाले. थरकाप उडवणारी ही घटना मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर स्थानिकांसह पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली.

जखमींना तातडीने उपचारासाठी पडघा येथील ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आले असून जखमींना खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-नाशिक महामार्गावरील खडवली फाट्याजवळ (Bhiwandi News) काळी पिवळी जीप प्रवाशांना घेऊन निघाली होती.

सकाळी ८ वाजेच्या सुमारास काळी पिवळी रस्ता क्रॉस करत असताना महामार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, काळी पिवळी जीप सुमारे ६० फूट दूर फेकली गेली.

या अपघातात ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू तर २ प्रवाशांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू (Accident) झाला. तर ६ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, या अपघाताचा पुढील तपास पडघा पोलिस करत आहे.

महामार्गावरील खडवली फाट्याजवळ अपघाताची महिनाभरातील ही दुसरी घटना असून यापूर्वी एका ट्रेलरने आईस्क्रीमच्या गाडीला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला होता. आज सकाळी पुन्हा याच ठिकाणी ट्रेलरने काळी पिवळी जीपला जोरदार धडक दिली.

मुंबई-पुणे महामार्गावर बोर घाटात भीषण अपघात

मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात सोमवारी रात्रीच्या सुमारास टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपगातात कारमधील ९ जण आणि टेम्पोचालक जखमी झाला आहे. जखमींपैकी दोन महिलांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

SCROLL FOR NEXT