Nagpur Accident google
महाराष्ट्र

Nagpur Accident: नागपुरात मोठा अपघात; चालकाचे नियंत्रण सुटले कार थेट भिंतीवर धडकली, ५ जण गंभीर जखमी

Car Accident: नागपुरात शुक्रवारी सायंकाळी भरधाव कारचे नियंत्रण सुटल्याने ती खोलगट भागात जाऊन भिंतीवर धडकली. या अपघातात पाच जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Dhanshri Shintre

नागपुरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका भरधाव कारचे नियंत्रण सुटल्याने ती खोलगट भागात कोसळली आणि भिंतीवर जोरदार धडकली. या दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

सदके रझाक हे कार चालवत असताना अंबाझरीकडून कॅम्पसकडे जात होते. मात्र, अचानक कारवरील त्यांचे नियंत्रण सुटले आणि भरधाव कार माणिकराव कुंभारे यांच्या मालकीच्या भिंतीवर आदळली. या धडकेत भिंतीचे मोठे नुकसान झाले असून कारमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे.

अपघातात वेदांत जाधव आणि तीन महिला जखमी झाल्या आहेत. या महिलांची नावे कीर्ती सुभाष गोले, गौरी अतुल सावरकर आणि पूजा धनंजय झाडे अशी आहेत. अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले असले तरी त्यांच्यावर उपचार सुरूच आहेत.a

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून संबंधित कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघाताचे नेमके कारण काय होते, कारचे ब्रेक फेल झाले होते का, चालक मद्यप्राशन करून गाडी चालवत होता का, यासंदर्भात पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पत्नीला खाऊ घातले ब्लेडचे तुकडे, पतीला न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा

न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलाच्या आलिशान कारची दुचाकीला धडक; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Itchy ears after bathing: आंघोळीनंतर तुमच्याही कानात सतत खाज येते? दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांनी सांगितलं कारण

Home Cleaning Tips: दिवाळीसाठी घराची साफसफाई करायची आहे? मग, वेळ आणि मेहनत वाचवणाऱ्या ७ सोप्या टिप्स नकी फॉलो करा

SCROLL FOR NEXT