Shaikh Manjur saam tv
महाराष्ट्र

Crime News : पालिका कर्मचा-याच्या तक्रारीनंतर शरद पवार गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल, 15 लाखाची खंडणी मागितल्याचा दावा

Beed Crime News : माजलगाव पाेलीस घटनेची कसून चाैकशी करीत आहेत.

विनोद जिरे

Beed News : बीड पालिका कर्मचाऱ्याकडून 15 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी माजलगाव पालिकेच्या माजी नगराध्यक्ष यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे बीडच्या माजलगाव नगरपालिकेमध्ये खळबळ माजली आहे. दरम्यान खंडणीचा गुन्हा दाखल झालेले माजी नगराध्यक्ष हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत. (Maharashtra News)

माजलगाव येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी नगरपालिकेचे कर्मचारी शिवहर शेटे यांना 15 लाखांची खंडणी मागितली. तसेच धमकी देऊन फसवणुक केल्या प्रकरणी त्यांच्या विराेधात पाेलीसांत तक्रार देण्यात आली. या तक्रारीनूसार शेख मंजूर यांच्या विराेधात माजलगाव शहर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

माजलगाव नगरपालिकेचे नामांतर विभाग प्रमुख शिवहर शेटे यांना 14 फेब्रुवारी 2019 रोजी नगरपालिकेत शेख मंजूर हे गेले. तेथे त्यांनी शेटे यांना काही कामे करण्यास सांगितले. नियमात बसत असेल तरच काम करेल, असे सांगताच मंजूर यांनी हुज्जत घातली.

तू सामान्य कर्मचारी आहे, तुझी वाट लावतो. माझे न ऐकल्यास तुला जीवे मारील, अशी धमकी दिली. याच वेळी तत्कालीन नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी दोघांनाही बोलवुन घेतले. चाऊस यांच्यासमोरही हा माझे काम कसे करीत नाही, असे म्हणत काटा काढील. त्याला सस्पेंड करील, त्याच्या तक्रारी करीन अन्यथा मला 15 लाख रुपये देण्यास सांगा, अशी धमकी मंजूर यांनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक नंबरचे स्वार्थी आणि ढोंगी असतात 'ही' माणसं! आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 'या' २ सवयींवरून ओळखा

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे दमदार आगमन

Mumbai Crime : मुंबईत भयंकर घडलं! आईच्या बॉयफ्रेंडचं टाळकं सटकलं, अमानुष मारहाणीत ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

राणेंनी कोकणात डाव टाकला! उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का; शेवटच्या तासात बाळ मानेंची माघार

Famous Producer Death : तेजस्वी तारा हरपला! ज्येष्ठ निर्मात्याचे निधन, मुंबईतल्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT