Sadabhau Khot expresses dissatisfaction over ministerial appointments in Mahayuti government saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महायुतीत धूसफूस? मंत्रिपदावरून बड्या नेत्याची नाराजी, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Politics : महायुती सरकारमध्ये मंत्रिपदावरून नाराजीचे सूर पुन्हा उमटले आहेत. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी नव्याने महायुतीत दाखल झालेल्या नेत्यांना मंत्रिपद मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

Bharat Jadhav

  • महायुती सरकारमध्ये मंत्रिपदावरून नाराजीचे सूर

  • रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मंत्रिपदाच्या वाटपावर नाराजी

  • नव्याने महायुतीत आलेले नेते मंत्री झाले, मात्र आपण पाहत बसलो, अशी खोत यांनी खंत व्यक्त केली.

राज्यातील महायुती सरकारमध्ये आलबेल नाहीये. सरकारमधील नाराजीनाट्य पुन्हा एकदा समोर आलाय. विधान परिषदेचे आमदार आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सत्तेतील राजकीय समीकरणांवर भाष्य करताना आपली नाराजी बोलून दाखवलीय. रयत क्रांती संघटनेच्या ऊस आणि इथेनॉल परिषदेत बोलताना खोत यांनी नव्याने महायुतीत दाखल झालेल्या नेत्यांना मंत्रिपद दिल्यामुळे नाराज व्यक्त केलीय.

बाहेरून सरदार आले आणि मंत्री झाले

इथेनॉल परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाचे कौतुक केलं. इथेनॉल मिश्रित पेट्रोलचेही समर्थनही केले. 'देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा फाटका माणूस तळातून वर येतो आणि दीडशे आमदारांचा नेता होतो. वाड्यातले सरदार फडणवीस यांच्या पायाला जाऊन मिठी मारतात.आम्ही पण तुमचंच आहोत' असं म्हणत खोत यांनी घराणेशाहीवर टीका केलीय.

परंतु ‘आपला विस्थापित व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि प्रस्थापित त्याच्यासमोर लोटांगण घालू लागले, हा खरा आमचा विजय असल्याचं खोत म्हणालेत. "पण पडळकर साहेब हे सरदार आले आणि साहेबांच्या पायाला लागले. ते मंत्री झाले आणि आपण फक्त बघत बसलो. आपल्यावर काय वाईट वेळ आल्याचं म्हणत त्यांनी नाराजीही व्यक्त केलीय.

यावेळी खोत यांनी सरकारकडे काही नेत्यांच्या कथित कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली. ‘मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. हे गडी आत घ्या, यांना तेल लावून चांगलं मालिश करा. त्यांनी बँका, सूतगिरण्या, साखर कारखाने कसे खाल्ले याचा रिपोर्ट करा. या सर्व प्रस्थापितांनी गावगाडा उध्वस्त केल्याचं खोत म्हणाले. बँकेच्या संचालकपदावरूनही त्यांनी टोला लगावला. ‘आमदाराला बँकेत संचालक व्हावं वाटतं, कारण त्यांना माहिती आहे की बँक ही अलीबाबाची गुहा आहे. त्या गुहेत गेलं की पोतं घेऊनच बाहेर पडता येतं असंही खोत म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेश मंडळांसाठी मोठी बातमी! 'या' चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत DJ-स्पीकर वाजवण्याची परवानगी

शिंदेंचा कार्यक्रम घेतला तर धिंगाणा होईल; जरांगेंचा शिंदेसेनेच्या खासदाराला थेट इशारा

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! भरधाव गाडीनं आधी दोघींना उडवलं, नंतर कार 25 फूट खड्ड्यात उलटली

कावड यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांचा टेम्पो पलटी; महामार्गावर अपघाताचा थरार

Maharashtra News Live Update: पुण्यातल्या DJ च्या वादात मनसेची उडी, थेट एकनाथ शिंदेंना केलं टार्गेट

SCROLL FOR NEXT