Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin: लाडक्या बहिणींना मिळणार फक्त 500 रुपये; 8 लाख बहिणींच्या हफ्त्यात कपात

Majhi Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहिण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे..8 लाख बहिणींच्या हफ्त्यात कपात केली जाणार आहे. पाहूया एक रिपोर्ट.

Girish Nikam

लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरु असतानाच लाडकीचं टेन्शन वाढवणारी माहिती समोर आली आहे. राज्यात 8 लाख लाडक्या बहिणींच्या हफ्त्यात कपात होणार आहे. आता महिन्याला हातात 1500 रुपयाऐवजी 500 रुपयेच पडतील. कारण अर्जांच्या छाननीत लाडकींना नमो शेतकरी योजनेंतर्गत 1 हजारांचा सन्माननिधी मिळत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे लाडकीच्या दर महिन्याच्या हप्त्यात कपात केली जाणार आहे.

बहिणींना आता 500 रुपयेच

8 लाख महिलांनी 2 योजनांचा लाभ घेतल्याचं उघड

नमो शेतकरी योजनेंतर्गत 1 हजारांचा सन्माननिधी

नमो शेतकरी योजनेचा निधी मिळत असल्यानं हप्त्यात कपात

एप्रिलपासून 8 लाख बहिणींना 500 रुपये मिळणार

राज्यात 8 लाख लाडक्या बहिणींना 500 रुपये देण्याच्या निर्णयावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय..मतांची किंमत आता 500 वर आलीय उद्या ती शून्य होईल असा टोला ठाकरे गटानं लगावलाय. तर महिलांना 500 रुपये देणाऱ्या सरकारची कीव येतंय असा हल्लाबोल काँग्रेसने केलाय. दुसरीकडे सर्व लाभार्थ्यांना दिलेल्या वचनानुसार निधी मिळणार असल्याचा दावा अर्थराज्यमंत्र्यांनी केलाय.

महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर लाडक्या बहिणींच्या अर्जांची काटेकोरपणे पडताळणी केली जात आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहितच सुमारे १५ लाख बहिणींना अपात्र ठरवण्यात आलंय. आगामी महिन्यात ही संख्या आणखी कितीवर जाणार हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT