Mahavitran News, karad saam tv
महाराष्ट्र

Mahavitran च्या कारभारामुळे शेतक-यावर खाया पिया कुछ नहीं गिलास तोडा बारह आना म्हणण्याची आली वेळ; नेमकं काय घडलं क-हाडात

शेतक-यांसमवेत महावितरण कार्यालयावर माेर्चा काढण्याचे नियाेजन करण्यात येत आहे.

संभाजी थोरात

Karad News : विद्युत महावितरण कंपनीचा भोंगळ कारभाराचा प्रकार कराड तालुक्यातील नांदगाव येथे समोर आला आहे. कनेक्शन नाही, वीज वापर नाही तरीही शेतक-यास 9 हजार आठशे पन्नास रुपयांच बिल देण्यात आले आहे. यामुळे शेतकरी कुटुंबास माेठा धक्का बसला आहे. (Maharashtra News)

नांदगाव येथील शेतकरी महादेव पाटील यांनी साडे सात एचपी पाण्याच्या पंपासाठी वीज कनेक्शन मिळावा म्हणून विद्युत कंपनीकडे अर्ज केला होता. त्यानंतर वर्षभर महादेव पाटील यांना कनेक्शनची वाट पाहावी लागली.

आजपर्यंत वीज कनेक्शन न मिळालेल्या पाटील यांच्या थेट वीजबिलच हातात पडले. तेही तब्बल 9 हजार आठशे पन्नास रुपयांचे. हे बिल पाहून पाटील यांच्या कुटुंबास धक्का बसला. कनेक्शन नाही, वीज वापर नाही तरीही बिल पाठविल्याने त्यांनी महावितरण कार्यालयात दाद मागितली.

तेथे त्यांना अधिकाऱ्यांनी बिल भरा असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता महादेव पाटील संतप्त झाले. साम टीव्हीशी बाेलताना त्यांनी शेतक-यांसमवेत महावितरणच्या विराेधात आंदोलन छेडणार असल्याचे स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates: तेजस्वी यादव फक्त ८०० मतांनी आघाडीवर

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज अपघात प्रकरणी गुन्हा दाखल, तिघांवर गुन्हा दाखल

Maharashtra Politics: ठाकरेंविरोधात पवार-शिंदे एकत्र; स्थानिक निवडणुकीसाठी नवं समीकरण, राजकारणात नवा सोलापूर पॅटर्न

Honeymoon Destination : डिसेंबरमध्ये हनीमून प्लॅन करत आहात तर, भारतातील या ठिकाणी नक्कीच जा

भारतीयांमध्ये Financial Planning चा गंभीर अभाव; 5 पैकी 2 व्‍यक्‍तींकडे 4 महिने पुरेल इतका आपत्‍कालीन निधी

SCROLL FOR NEXT