mahavitran employees arrested in bribery case near parbhani saam tv
महाराष्ट्र

Mahavitran चे कर्मचारी परभणी ACB च्या जाळ्यात

तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात धाव घेतली हाेती.

राजेश काटकर

Parbhani News :

विद्युत मीटर नावावर होण्यासाठी ऑनलाईन अर्ज व शुल्क भरल्यानंतर लवकर काम करुन देण्यासाठी एक हजार सहाशे रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत दाेघे जण (mahavitran employees arrested in bribery case near parbhani) अलगद अडकले. ज्ञानेश्वर सखाराम लहाणे (कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक) आणि जयश्री तुळशीराम चव्हाण असे लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे असल्याची माहिती एसीबीने दिली. (Maharashtra News)

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनूसार तक्रारदार यांनी घर विकत घेतले होते. जुन्या मालकाच्या नावे असलेले विद्युत मीटर तक्रारदार यांच्या नावे होण्यासाठी त्यांनी ऑनलाईन अर्ज व त्याचे शुल्क भरुन प्रिंट काढली.

30 नोव्हेंबर रोजी सदर अर्ज, शुल्क पावती देण्यासाठी तक्रारदार महावितरण कार्यालय झोन-३ परभणी या ठिकाणी आले. येथे जयश्री चव्हाण यांनी तक्रारदार यांच्याकडून ऑनलाईन अर्जाची प्रत स्विकारुन त्यावर पोहच दिली. या कामासाठी तीन महिने लागतील. जर तुम्हाला तुमचे काम लवकर करुन घ्यायचे असेल तर खर्च लागेल असे म्हणत लाचेची मागणी केल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.

दरम्यान तक्रारदार यांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परभणी कार्यालयाकडे तक्रार दिली. या तक्रारीवरुन पडताळणी केली असता जयश्री चव्हाण यांनी ज्ञानेश्वर लहाणे यांच्या सांगण्यावरुन 1 हजार600 रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एसीबीने शुक्रवारी (ता. एक डिसेंबर) लावण्यात आलेल्या सापळ्यात तक्रारदार यांच्याकडून रक्कम स्विकारली. पथकाने दोन्ही लाचखोरांना ताब्यात घेतले असून कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT