Congress Saam TV
महाराष्ट्र

Breaking : महाविकास आघाडीत बिघाडी ? काँग्रेस हायकमांड उद्या घेणार निर्णय

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणीक

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाविकास आघडी सरकार अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस राहणार की जाणार ? यासाठी उद्या दिल्लीत कॉंग्रेस हायकमांडकडून निर्णय होणार असल्याचंही समजते. दरम्यान, काँग्रेस हायकमांडने उद्या महाराष्ट्रातली प्रमुख मंत्र्यांना तातडीने दिल्लीत बोलवले आहे. महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस राहणार की जाणार? यावर दिल्लीत उद्या कॉंग्रेसच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस हायकमांडने उद्या महाराष्ट्रातली प्रमुख मंत्र्यांना तातडीने दिल्लीत बोलवले आहे. राज्यात सरकार असूनही काँग्रेसला दुय्यम वागणूक मिळत आहे. काँग्रेसच्या विषयाबाबत दोन्ही मित्र पक्षांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत कोर्ट लढाईत काँग्रेस एकाकी पडली. राष्ट्रवादीने काँग्रेसची कोंडी केली. काँग्रेसचे नगरसेवक फोडले. आमदार निधी मध्ये भेदभाव केला. यामुळे काँग्रेस मधील नाराजी टोकाला पोहोचली आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे स्थान असेल की नाही, यावर उद्या दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात ३५ हजार महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

SCROLL FOR NEXT