Sharad Pawar On Uddhav Thackarey Demand google
महाराष्ट्र

Assembly Election: विधानसभेसाठी मविआचा कोणी 'चेहरा' नाही, निकालानंतरच ठरणार मुख्यमंत्री

Sharad Pawar On Uddhav Thackeray Demand: महाविकास आघाडीत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेच राहितील. तेच मुख्यमंत्री होतील असा दावा ठाकरे गटाकडून केला जात होता. मात्र हा दावा खोडून काढलाय.

Tanmay Tillu

मविआत मुख्यमंत्रिपदाच्या चेह-यावरून पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. कारण उद्धव ठाकरेंची चेहरा जाहीर करण्याची मागणी पवारांनी फेटाळून लावलीय. आता जे काही आहे ते निकालानंतरच ठरणार असल्याचं पवारांनी जाहीर केलंय. त्यामुळे हा मुद्दा निकाली निघणार की वाद होणार यावरचा हा विशेष रिपोर्ट.

विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यावरून गेल्या काही दिवसांपासून मविआत जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र आता हा मुद्दा शरद पवारांनी निकालात काढलाय. कारण मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची उद्धव ठाकरेंनी वारंवार केली होती. मात्र आता कशात काही नाही असं सांगत निकालानंतरच याबाबत निर्णय घेण्यात येईल असं पवारांनी ठामपणे सांगितलंय.

उद्धव ठाकरेंनी भाजपशी फारकत घेतल्यानंच मविआची निर्मिती झाली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मात्र राज्यातील राजकीय गणितं बदललीएत. त्यात राष्ट्रवादीतही फुट पडलीये. लोकसभा निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईकरेट सर्वाधिक राहीला. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करताना पवार सावध खेळी खेळताना दिसतात. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर न करुन एकप्रकारे पवारांनी ठाकरेंच्या मनसुब्यांवर पाणी फिरवलंय एवढं नक्की. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या भुमिकेकडे लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT