Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Weather Update: थंडी आली, शेकोट्या पेटवायची वेळ झाली, पुढचा आठवडाभर महाराष्ट्र कुडकुडणार; कसं असेल तापमान?

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढचा आठवडाभर थंडीची लाट कायम राहणार आहे. महाराष्ट्रातील किमान तापमान हे १ ते २ अंशानी कमी झाले आहे.

Siddhi Hande

देशात आता हिवाळा सुरु झाला आहे. महाराष्ट्रातदेखील थंडी दिवसेंदिवस वाढत आहेत. येत्या काही दिवसात थंडी अजून वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात रविवारपासूनच थंडीत हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली होती.

पुढील आठवडाभर थंडी टिकून राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे पुढील आठवडाभर राज्यात थंडी अशीच टिकून राहणार आहे. सध्या महाराष्ट्रात दुपारचे कमाल वातावरण ३१ टक्के तर पहाटेचे किमान तापमान १५ ते १६ डिग्री सेंटीग्रेटेडच्या दरम्यान आहेत. हे तापमान एक दोन डिग्रीपेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. मंगळवारी २६ नोव्हेंबरपर्यंत आठवड्यानंतर थंडी सातत्य टिकून असण्याची शक्यता आहे.

राज्यात थंडीचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. थंडी वाढल्यामुळे गावागावात शेकोट्या पेटताना दिसत आहेत. तसेच उबदार कपडे खरेदी करण्यासाठीही ग्राहकांची गर्दी होत असल्याचे दिसत आहे.

आज पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढत आहे. पुणे जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण राहणार आहे. आज तापमानात २ अंशाची घट झाली आहे. किमान तापमान १६ अंश आहे. कमाल तापमान २९ अंश सेल्सियस आहे. साताऱ्यात आज २८ अंश सेल्सियस कमाल आणि १४ अंश सेल्सियस किमान तापमान असेल.सांगलीतदेखील तापमानात १ अंशाची घट झाली आहे. किमान तापमान १६ अंश सेल्सियस तर कमाल तापमान ३० अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्नासाठी १४ कोटींचा पॅलेस बुक; होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवशी ट्रेकिंगला गेलेल्या बिल्डरच्या मुलाचा मृत्यू, लोहगडावर नेमकं काय झालं?

PM Kisan Yojana : शेतकऱ्याच्या खात्यावर किती वाजता जमा होणार ₹२०००? पीएम किसान योजनेची महत्त्वाची अपडेट आली समोर

पुण्यात रक्तरंजित थरार; नराधमाने 'लिव्ह-इन पार्टनर'च्या ३ वर्षीय मुलाला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण समोर

Haunted Fort : भारतातील ५ सर्वात भयानक अन् रहस्यमय किल्ले, सूर्यास्तानंतर येथे जाण्याची कोणी हिंमतच करत नाही

Director-Actress : अभिनेत्रीला जवळ ओढलं, कमरेत हात टाकला अन्...; प्रसिद्ध दिग्दर्शकानं मर्यादा ओलांडल्या, VIDEO तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT