Maharashtra Monsoon Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Monsoon Update : मुंबईत पावसाची दांडी, विदर्भात आज विजांच्या कडकटासह तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Monsoon Update : राज्यात पावसाचा जोर ओसरला असून अनेक भागात ऊनसावल्यांचा खेळ पाहायला मिळत आहे. विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात पावसाचा जोर ओसरला असून ऊनसावल्यांचा खेळ सुरु आहे.

  • विदर्भातील काही जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता – येलो अलर्ट.

  • सोलापूरमध्ये उच्चांकी ३१.८ अंश सेल्सिअस तापमान नोंद.

  • हवामान खात्याचा अंदाज – राज्यात ढगाळ वातावरण आणि हलक्याशा सरी शक्य.

राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून काही ठिकाणी ऊन सावल्यांचा खेळ सुरु आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार आज राज्यात ढगाळ वातावरण असणार आहे. मात्र विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरींची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.

बुधवारी सकाळपर्यंत २४ तासांमध्ये कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते जोरदार सरींनी हजेरी लावली. गुरुवारपासून मात्र पावसाचा जोर ओसरला आहे. गेले काही दिवस सतत पाऊस पडल्याने कमाल तापमानाचा पारा सातत्याने ३० अंशांच्या खाली आहे. तसेच सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

महिन्याच्या अखेरीस राज्यात पावसाने उघडीप दिली असून राज्यात ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. आज अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात विजांसह पावसाच्या सरींची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी राज्यातील तापमान कसे होते? जाणून घ्या

ठिकाण - तापमान कमाल - तापमान किमान

पुणे - २७.५ - २१.९

‎‎धुळे - २९.० - २०.०

जळगाव - २७.६ - २३.३

जेऊर - ३१.५ - २१.०

‎‎कोल्हापूर - २४.९ - २१.७

‎महाबळेश्वर - १८.९ - १७.६

मालेगाव - २६.४ - २०.८

नाशिक - २६.३ - २२.२

‎निफाड - २७.७ - २२.२

‎सांगली - २८.१ - २२.०

‎सातारा - २५.६ - २२.०

‎सोलापूर - ३१.८ - २३.८

‎सांताक्रूझ - २९.६ - २६.०

डहाणू - २९.२ - २५.०

‎रत्नागिरी - २९.५ - २४.५

छत्रपती संभाजीनगर - २६.४ - २२.४

‎धाराशिव - २८.१ - २१.२

‎परभणी - २७.५ - २२.५

‎‎अकोला - २७.० - २३.७

अमरावती - २५.४ - २१.५

भंडारा - २७.० - २३.०

बुलडाणा - २५.४ - २२.२

‎चंद्रपूर - २७.२ - २३.६

‎गडचिरोली - २६.२ - २२.८

‎गोंदिया - २७.१ - २३.४

‎नागपूर - २५.७ - २३.६

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : दोन पाटलांमध्ये कलगीतुरा, सांगलीत राजकीय राडा; सभापती निवडणुकीआधीच डायलॉग हाणला, इतिहासच काढला

Virar Picnic Spot : हिरवागार निसर्ग, निळाशार समुद्र अन् उंच डोंगर; वीकेंडला फिरायला 'विरार'च बेस्ट, पाहा टॉप ५ डेस्टिनेशन्स

Maharashtra Live News Update: नांदेडच्या बिलोली तालुक्यातील चर्चेत असलेला तलवार बाबा साम टीव्हीवर

Crispy Bitter Gourd Pakoda: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा कुरकुरीत कारल्याची भजी, सोपी आहे रेसिपी

Satara : साताऱ्यात शासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर; मृतदेहांची झाली अदलाबदल, कुटुंबाकडून संताप

SCROLL FOR NEXT