Maharashtra Rain Update  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather: राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरूच! विदर्भात पडणार पाऊस; आज कसं राहिल हवामान?

Maharashtra Rain Update: ३० ऑक्टोबरला फक्त विदर्भातच पाऊस पडेल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर अशा तीन जिल्ह्यात फक्त ढगाळ वातावरण राहिल.

Priya More

पावसाळा संपला तरी देखील राज्यात पावसाने विश्रांती घेतली नाही. नवरात्रोत्सव संपला तरी देखील पाऊस गेला नाही. दिवाळीवर देखील पावसाचे सावट आहे. दिवाळीला सुरूवात झाली ऐन दिवाळीमध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज राज्यातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल. तर विदर्भात फक्त पावसाचा अंदाज आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबरला फक्त विदर्भातच पाऊस पडेल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर अशा तीन जिल्ह्यात फक्त ढगाळ वातावरण राहिल. तर विदर्भातील अकोला, वर्धा आणि नागपूर या तीन जिल्ह्यात ढगाळ वातावरणसहित किरकोळ पाऊस राहिल. तर ३० उर्वरित जिल्ह्यात फक्ते स्वच्छ वातावरण राहिल.

हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील २ दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. ३० ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात मेघ गर्जनेसह, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाट आणि ३०-४० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

राज्यातील पावसाचा अंदाज लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावे आणि काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. राज्यात रब्बी हंगाम सुरू झाला आहे. शेतामध्ये पेरणीच्या कामाला वेग आला आहे. अशामध्ये सध्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: फ्लाय ९१ ची नवी मुंबईतून सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू

Vande Bharat Train: मुंबई- बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी सुरू होणार? प्रवासाचे ८ तास वाचणार; वेळापत्रक अन् थांबे कोणते?

बायकोला टीबी, मुलीची फी भरायला पैसे नाही; शिवार हेल्पलाईनवर शेतकऱ्यांचा टाहो, 'या' 5 जिल्ह्यांतून सर्वाधिक कॉल

Rajyasbha Election: भाजपमध्ये मोठा फेरबदल होणार; मोदी सरकारमधील दोन केंद्रीय मंत्री देणार राजीमाना?

Nashik Fort : नावच सांगतंय इतिहास! शिवरायांनी घेतलेल्या विश्रांतीमुळे प्रसिद्ध झाला किल्ला

SCROLL FOR NEXT