Maharashtra Weather Update Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: अंगाची लाही-लाही होणार! मार्चमध्ये ऊन- पावसाचा खेळ, तीव्र उष्ण लाटांसह पावसाचा अंदाज

IMD Alert For Maharashtra: मार्च महिन्यात राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक आहे. तीव्र उष्णतेसह राज्यात पावसाची शक्यता देखील आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Priya More

उन्हाळा सुरू झाला असून तापमानात वाढ होत चालली आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमानाचा पारा मार्च महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. यंदाच उन्हाळा तापदायक ठरण्याची शक्यता आहे कारण मार्चमध्ये तीव्र उष्ण लाटांची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होण्याची शक्यता आहे. तीव्र उष्ण लाटांसोबत राज्यात पावसाचा देखील अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक आहे. परिणामी, मार्च महिन्यातच उन्हाच्या झळा आणखी वाढणार असून ९ ते १५ दिवसांपर्यंत टिकून राहणाऱ्या उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले.

१९०१ पासूनच्या नोंदीनुसार फेब्रुवारी महिन्यात किमान तापमानाचा पारा आतापर्यंत सर्वोच्च पातळीवर होता. कमाल तापमान आतापर्यंतचे दुसरे सर्वोच्च ठरले. पश्‍चिम किनारपट्टीवरील केरळ, कर्नाटकसह कोकणात उष्णतेची लाट होती. सध्या सौम्य 'ला-निना' स्थिती असून लवकरच तटस्थ 'एल-निनो'' निर्माण होण्याचे संकेत आहेत. ही स्थिती कायम राहणार असल्याने मॉन्सूनवर कोणताही प्रभाव पडणार नाही.

दरम्यान, यंदाच्या उन्हाळ्यात देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे. या कालावधीत सकगळीकडे किमान तापमान देखील सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक आहे. मार्च महिन्यापासूनच तीव्र उष्ण लाटा येण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. देशातील महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, हरियाना, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या उत्तर भागांत उष्णतेचा तीव्र लाटा येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील हवामान खात्याने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT