Maharashtra Weather Update  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather: राज्यात पावसाचा जोर कायम! कोकण, मराठवाड्यासह, मध्य महाराष्ट्रात जोरदार कोसळणार; वाचा हवामान अंदाज

Maharashtra Rain News Weather Update: पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. २१) वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Gangappa Pujari

Maharashtra Weather Update News: एकीकडे राज्यात कमालीचा उडाका जाणवत असतानाच परतीच्या पावसाचा धुमाकूळही पाहायला मिळत आहे. हवामानामध्ये होणाऱ्या बदलामुळे नागरिकही हैराण झाले असून पावसामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. आज (ता. २१, ऑक्टोबर) राज्यात विविध भागात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.

राज्यात सध्या ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. एकीकडे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर सुरू असतानाच ‘ऑक्टोबर हीट’चा चटकाही जाणवत आहे. सकाळी ऊन आणि संध्याकाळी पाऊस अशीच स्थिती काही भागात पाहायला मिळत आहे. विदर्भ, मराठवाड्यात उन्हाचा चटका चांगलाच त्रासदायक ठरत आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. २१) वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

आज कोकणामधील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांमध्ये तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नंदुरबार, धुळे , जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, रायगडसह कोकणात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रोज वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडतो आहे. पावसाळा संपला असून परतीचा थांबण्याचे नाव घेत नाही. दरम्यान अनेक ठिकाणी ढग फुटी सदृष्य पाऊस देखील कोसळत असून याचा थेट फटका भातशेती करणाऱ्या शेतकऱ्याला बसला आहे. परतीच्या पावसामुळे कापणी योग्य भाताचे पिक शेतातील चिखलात पडले असून ते अंकूरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नेत्यांच्या बेडरूममध्ये गेल्याशिवाय ९० टक्के महिला राजकारण करू शकत नाहीत; खासदार पप्पू यादव यांचे वादग्रस्त विधान

Crime News: नंबर ब्लॉक केला, दुसऱ्याच मुलाशी केली मैत्री; रागाच्या भरात बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडला संपवलं

Long Hair Growth Tips: लांब आणि सरळ केसांसाठी 5 सोपे घरगुती उपाय

Wednesday Horoscope : वैवाहिक आयुष्यात वादळ येण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना धाडसी निर्णय घ्यावे लागतील

SCROLL FOR NEXT