India Meteorological Department has issued a yellow alert for heavy rain, thunderstorms and gusty winds in several Maharashtra districts. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

Weather Update: भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे.

Bharat Jadhav

  • अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

  • विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • मुंबई आणि कोकणात दमट व उष्ण हवामान असणार.

हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र मुंबई आणि कोकणातील काही जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट ही जाहीर करण्यात आला आहे. पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मध्य प्रदेशापासून विदर्भ, मराठवाडा आणि कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम प्रतीचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

या स्थितीमुळे विदर्भ आणि दक्षिण मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. या भागात ताशी ४०-५० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे. अरबी समुद्राकडून येणारे आर्द्र वारे आणि केरळ किनारपट्टीलगत सक्रिय असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे.

विदर्भासह दक्षिण मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३०-४० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे. कोकण-गोव्यातील काही भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची दाट शक्यता आहे.

राज्यात तापमानात घट झाली असून अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसांचा अलर्ट देण्यात आलाय. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UP Politics: मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजपमध्ये नाराजी उफाळली? माजी खासदाराच्या विधानाने खळबळ

Face Care: चेहऱ्यावर नॅचरल ग्लो आणि सॉफ्टनेस पाहिजे? मग घर बनवलेला हा फेसमास्क नक्की लावा

6,6,6,6,6,6...IPL इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक; उर्विल पटेलचा तडाखा, अवघ्या १३ चेंडूंत ठोकली फिफ्टी

पाण्याअभावी रहिवासी हैराण; डोंबिवलीत बिल्डरविरोधात जोरदार आंदोलन

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणातील पीडित मुलीचे आई-वडील मूक मोर्चात सहभागी

SCROLL FOR NEXT