Heavy rain alert issued for Mumbai, Thane, Palghar, and Nanded — thunderstorms expected in the next 48 hours. saam tv
महाराष्ट्र

Weather Update: पुढील दोन दिवस ढगांच्या गडगडाटसह मुसळधार पाऊस; ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा

Maharashtra Weather Update: मुंबई, ठाणे, पालघर आणि नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात पुढील दोन दिवसांत वादळांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

  • पुढील दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज.

  • नांदेडमध्ये महिनाभरापासून पावसाचा हाहाकार सुरू, पूरस्थिती कायम.

  • हवामान विभागाने गडगडाटासह पावसाचा इशारा दिला आहे.

राज्यभरात मुसळधार पावसाने पुन्हा एकदा कहर माजवलाय. नांदेड जिल्ह्यांमध्ये तर महिनाभरापासून पावसाचा हाहकार सुरूय. नांदेड, मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर यांसह संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस चालू आहे. मुसळधार पावसाने मुंबई-ठाणे, नवी मुंबई परिसराला सोमवारी झोडपून काढलं. यानंतर आता पुढील दोन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटसह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय.

संपूर्ण राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झालाय. मुंबईसह उपनगरांत पावसाचा जोर अधिक आहे. ठाणे जिल्ह्यात पावसामुळे अनेक रस्ते जलमय झालेत. ठाण्यात १२.२ मिमी पावसाची नोंद झाली. तर कुलाबा येथे २४.७ मिमी, सांताक्रूझ येथे २९.६ मिमी पावसाची नोंद झाल्याचे सांगितले जात आहे. राज्याच्या इतर भागातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

दरम्यान मुंबई बरोबरच राज्यातील इतर भागातही पावसाचा जोर आहे. याआधी पडलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झालंय. कापूस, सोयाबीन आणि इतर खरीप पिकांचे नुकसान अधिक होण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यात आसना नदीला आलेल्या पुरामुळे गाडेगाव परिसरातील पुलावरून पाणी वाहू लागलंय.पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक शेतजमिनींमध्ये सोयाबीन, कापूस, उडीद, तूर यासह खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून पावसाने जबरदस्त बॅटिंग करत आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व शेताना तलावाचे स्वरूप आले आहे. पळसखेड चक्का या गाव परिसरातील शेताला तलावाच स्वरूप आल्याने

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींसोबत आज मनोबल वाढवणाऱ्या घटना घडतील; वाचा राशीभविष्य

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

SCROLL FOR NEXT