Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: थंडी गायब! राज्यात गारपिटीसह पावसाची शक्यता, यलो अलर्ट जारी

IMD Alert For Maharashtra: बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातील तापमानावर दिसून येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील ४८ तासांमध्ये गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Priya More

हिवाळा सुरू असताना राज्यातील जनता पावसाळा अनुभवत आहे. राज्यातील जनता आता कुठे गुलाबी थंडीचा आनंद घेत होती तोवर तापमानात मोठे बदल झालेत. राज्यात कधी थंडी तर कधी पाऊस असा खेळ सुरू आहे. ऐन हिवाळ्यामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात आता आजपासून अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा परिणाम दक्षिण किनारपट्टीवर दिसून येत आहे. आता महाराष्ट्रावर देखील याचा परिणाम होत आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात आजपासून पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारपासून पुढच्या ४८ तासांपर्यंत राज्याच्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र क्षेत्रामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील तापमानामध्ये झालेल्या मोठ्या बदलामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. ढगाळ वातावरण, पाऊस आणि गारपीट यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात तर हवामान खात्याने गारपिटीचा यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. राज्यात पुढील ३ दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशाच्या उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि दक्षिणेकडून वाहणारे बाष्पयुक्त वारे यामुळं महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव कमी होताना दिसत आहे.

दरम्यान, तर २८ डिसेंबरला विदर्भातली यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पहाटेपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. २९ डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी वगळता राज्यातील बहुतांश भागांत स्थिर हवामान पहिला मिळेल आणि ३० डिसेंबरपासून पुन्हा थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT