Weather Forecast Yandex
महाराष्ट्र

Weather Forecast: उत्तरेकडील राज्यांमध्ये गारपीटीची शक्यता; महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळीचे संकट

Weather Upadate: उत्तरेकडील राज्यांमध्ये पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातही विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज आहे.

Rohini Gudaghe

Maharashtra Weather Todays Upadate

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहायला मिळतेय. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता (Maharashtra Weather) वर्तविली जात आहे. हवामान विभागाने १६ व १७ मार्चला विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तिवली आहे. (latest weather update)

राज्यात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळं तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. उन्हाचा चटका वाढल्यामुळे उकाड्यातही वाढ झाली (Weather Upadate) आहे. मोठ्या प्रमाणात आता उन्हाच्या झळा जाणवत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या वर सरकले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अवकाळी पावसाची आणि गारपीट होण्याची शक्यता

मार्च आणि एप्रिल महिन्यात यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात तीव्र उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तवली जात (Weather Forecast) आहे. मागील आठवड्यात पुण्यासह संपूर्ण राज्यातील तापमान कोरडे होते. कमाल तापमानामध्ये सरासरीपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये हवामान विभागाने अवकाळी पावसाची आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे. दिल्लीत देखील पावसाचा इशारा (Rain) देण्यात आला ( Weather Todays Upadate) आहे. दक्षिण कर्नाटक आणि उत्तर आंध्र प्रदेशमध्ये चक्राकार वाऱ्याच्या स्थिती आहेत.

तापमानात वाढ

महाराष्ट्र राज्यातून थंडीने काढता पाय घेतला आहे. उकाड्यात वाढ झालीय. विदर्भ ते कोकणापर्यंत तापमानवाढ झाल्याचं दिसतंय आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या तापमानवाढ झाली (Summer Season) आहे. कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे आणि पालघरमध्येही तापमानात वाढ होतेय. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती आहे. आता एप्रिल, मे आणि जून महिन्यापर्यंत काय स्थिती असेल, असा प्रश्न पडत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजवंदना आणि शस्त्र पूजन

Shiv Sena Dussehra Melava: शिंदे अन् ठाकरेंची आज तोफ धडाडणार, दसरा मेळाव्यातून शक्तिप्रदर्शनाची तयारी; कुठे अन् किती वाजता होणार सभा?

जगभरात Gen Z आंदोलनांचा भडका, सत्ताधाऱ्यांंविरोधात नागरिक रस्त्यावर

Gokul Election 2026: सतेज पाटलांनी विरोधकांना दाखवलं आस्मान; वाचा विजयी उमेदवारांची यादी

Skin Care : नाकावर ब्लॅकहेड्स वाढले आहेत? जाणून घ्या घरच्या घरी करता येणारे ७ सोपे उपाय

SCROLL FOR NEXT