Weather News saam tv
महाराष्ट्र

Weather Update : राज्यात आज आणि उद्या या ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता; विदर्भात हुडहुडी कायम

मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Ruchika Jadhav

Maharashtra Weather News : राज्यात विदर्भ आणि कोकणात थंडीचा जोर कायम आहे. तर मुंबईसह इतर ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. अशात आता राज्यात आज आणि उद्या थंडीचा जोर थोडा कमी होणार असून मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Latest Weather News)

राज्यात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी विजांच्या कडक्यात सरी कोसळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. अशात याने शेतीचे नुकसान होऊ शकते. राज्यात सातत्याने हवामानात बदल जाणवत आहे. त्यामुळे काही ठिकाणी कांदा पिकावर करपा रोगाचा फैलाव होत आहे. जर मुसळधार पाऊस झाला तर कांदा पिकाचे आणखीन जास्त नुकसान होऊ शकते. या आधी परतीच्या पावसाने खरीप हंगामात पिकांच मोठं नुकसान झालं आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मराठवाड्यात २८ आणि २९ जानेवारीला ढगाळ वातावरण राहू शकते. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील थंडीची लाट थोडी कमी होऊ शकते. तसेच मुंबईमध्ये देखील थंडीची लाट कमी झाली असून आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण दिसत आहे.

राज्यात आज आणि उद्या पावसाची शक्याता आहे तर २९ जानेवारीनंतर पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढणार आहे. पुढचे ४ ते ५ दिवस कडाक्याची थंडी कायम राहणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. मध्य महाराष्ट्रात २९ जानेवारीनंतर थंडीची लाट येणार आहे. तसेत मुंबईतील किमान तापमान २ नोव्हेंबरपर्यंत सरासरीपेक्षा घसरण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beauty Tips : नाकावरील ब्लॅक अन् व्हाइट हेड्स जात नाहीत? 'या' 5 टिप्स करा फॉलो

Atul Chavan Resign : मोठी बातमी! भाजप महिला आमदाराच्या पतीचा राजीनामा; PWD मुख्य अभियंतापद सोडलं

Maharashtra News Live: राऊत बोलत राहतात त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही- छगन भुजबळ

IBPS Recruitment : सरकारी बँकांमध्ये मेगाभरती; ११००० पदे, अर्ज कसा कराल, महाराष्ट्रात किती पदे?

Tehseen Poonawalla: 'माझ्या घरावर पोलिसांची धाड, मला नजरकैदेत ठेवलं'; E-20 विरोधात उपोषणाआधीच तहसीन पुनावालांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT