Maharashtra Weather Forecast Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather: उष्णतेचा भडका! सूर्य आणखी आग ओकणार, राज्यात आज कुठे कसं तापमान?

Maharashtra Weather Forecast: राज्यात मुंबईसह सगळीकडेच उन्हाचे चटके जाणून लागले आहे. तापमानाचा पारा हळूहळू चढत आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आज राज्यात कुठे कसं हवामान आहे ते घ्या जाणून...

Priya More

राज्यात तापमानामध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यातील कमाल तापमान चांगलंच वाढले आहे. राज्यात सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. उष्णतेचा भडका उडाल्यामुळे राज्यातील जनता उकाड्यामुळे हैराण झाली आहे. येत्या काही दिवसात राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी पहाटे हलकी थंडी आणि दिवसा कडाक्याचे ऊन असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात मुंबईसह सगळीकडेच उन्हाचे चटके जाणून लागले आहे. तापमानाचा पारा हळूहळू चढत आहे. राज्यातील सोलापूरमद्ये देशातील उच्चांकी ३९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आजही राज्यात तापमानात कमालीची वाढ होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सोलापूर पाठोपाठ चंद्रपूर येथे ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील जेऊर, सांगली, मराठवाड्यातील परभणी, अकोला, ब्रह्मपुरी येथील तापमान ३८ अंशांच्या पुढे गेले आहे. कोल्हापूर, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या ठिकाणचे तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या वर पोहचले आहे.

वाढते तापमान आणि उकाड्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. नागरिकांनी वाढते तापमान लक्षात घेता काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे. तसंच, जास्तीत जास्त पाणी प्यावे असा सल्ला दिला जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं टाळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : भयंकर! सून घरात एकटीच, सासरा आणि २ दीर छप्पर तोडून घरात घुसले ; पुढे जे घडलं त्याने पायाखालची जमीन हादरली

Amboli WaterFalls : पावसाळ्यात एकदा तरी पाहाच आंबोलीतील 'हे' ठिकाण, जिथे धबधब्याचे पाणी खाली नव्हे तर वर उडते

Mumbai News : अभिनेत्याने केला १६ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Maharashtra News Live Update:पाकिस्तानी गुंडांशी संपर्काच्या संशयाने कोल्हापुरातील दोघे चौकशीसाठी ताब्यात

Maharashtra rain: राज्यात मान्सूनला मोठा ब्रेक; 'या' कारणामुळे गायब झाले ढग, हवामान खात्याचा नवीन अंदाज काय?

SCROLL FOR NEXT