Weather Update In Marathi : पावसाने कायमची माघार घेतल्यानंतर आता राज्यभरात थंडीची चाहूल लागली आहे. पण अद्याप राज्यात पूर्णपणे थंडी सुरु झालेली नाही. राज्यात सध्या कमाल आणि किमान तापमानाचा पारा कमी जास्त होत आहे. त्यामुळे दुपारी ऊन्हाचा चटका बसत आहे, तर रात्री थंडी जाणवत आहे. राज्यातील काही भागात थंडीची चाहूल लागली आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये हवेची गुणवत्ता खराब झाली आहे.
कोकणात आणि विदर्भात उन्हाचा चटका वाढत आहे, तर दुसरीकडे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात रात्री हवेत गारवा जाणवत आहे. दुपारी उन्हाचा चटका आणि रात्री हुडहुडी भरवणारी थंडी अशी स्थिती राज्यात अनेक ठिकाणी झाली आहे. आजही राज्यातील तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुढील पाच दिवस राज्यात कसं असेल तापमान?
राज्यभरात थंडीची चाहूल लागली आहे. पण महाराष्ट्रात नोव्हेंबर अखेर थंडी सुरु होण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्राच्या तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता कमीच आहे. कोरड्या हवामानासह निरभ्र आकाश राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
उत्तर भारतात काही भागात गारठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. परंतु महाराष्ट्रात मात्र कडाक्याच्या थंडीसाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. राज्याच्या तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसनं चढ-उतार होऊ शकतो. पुढील पाच दिवस मुख्यत: कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका जाणवण्याची शक्यता केंद्रीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.