Uddhav Thackeray’s Name Appears in Marathwada Graduate Voter List 
महाराष्ट्र

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

Uddhav Thackeray Voter List : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रारूप मतदार यादीत उद्धव ठाकरे यांचे नाव आढळल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. हे नाव दोन ठिकाणी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

Uddhav Thackeray name in Marathwada graduate voter list : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रारूप मतदार यादीत मोठा प्रशासकीय गोंधळ समोर आला आहे. या प्रारूप यादीमध्ये चक्क शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव आढळल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे या मतदार यादीत दोन ठिकाणी हे नाव आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.

निवडणूक आयोग आणि प्रशासनाच्या या अजब कारभारामुळे मतदार याद्यांच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या गंभीर प्रकारानंतर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिलीप हरिभाऊ घुगे यांनी तातडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. दिलीप घुगे यांनी निवडणूक विभागाकडे याप्रकरणी अधिकृत तक्रार दाखल केली असून, मतदार याद्यांमधील सर्व चुका आणि घोळ तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.

छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत 'उद्धव मस्के' ऐवजी थेट शिवसेना पक्षप्रमुख 'उद्धव ठाकरे' यांचे नाव छापून आले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे राजकीय वर्तुळात आणि मतदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिलीप घुगे यांनी यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्तांना थेट ईमेलद्वारे पत्र पाठवून तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

भाग क्रमांक ६५० आणि अनुक्रमांक १५० मध्ये नातेवाईकाच्या नावाच्या जागी 'उद्धव मस्के' ऐवजी 'उद्धव ठाकरे' असे नाव आले आहे. एकाच कुटुंबातील एका मतदाराचे नाव भाग क्र. ६४६ वर, तर दुसऱ्या सदस्याचे नाव भाग क्र. ६५४ वर टाकण्यात आले आहे. भाग क्रमांक ६५४ चे मतदान केंद्र मतदारांच्या घरापासून जवळपास १० किलोमीटर अंतरावर देण्यात आले आहे, ज्यामुळे मतदारांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

या सर्व चुकांमुळे मतदानावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा देत दिलीप घुगे यांनी या सर्व चुका तातडीने दुरुस्त करण्याची मागणी निवडणूक प्रशासनाकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

"ओमराजे परत जा!" MPSC आंदोलनात शिंदेंच्या खासदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी, वातावरण तापले

SCROLL FOR NEXT