Maharashtra draft electoral roll 2026 2.06 crore names missing Saam tv
महाराष्ट्र

राज्यातील २ कोटींहून अधिक मतदारांची नावे कट; यादीत तुमचे नाव आहे की नाही? मिनिटांत असे तपासा

महाराष्ट्राच्या SIR 2026 प्रारुप मतदार यादीत २ कोटी ६ लाखांहून अधिक मतदारांची नावे समाविष्ट झालेली नाहीत. तुमचे नाव यादीत आहे की नाही, EPIC, तपशील किंवा मोबाईल OTPद्वारे एका मिनिटात तपासता येणार आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra voter list 2026 check name online : महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ (SIR 2026) मोहिमेदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ (२१.१४%) मतदारांची नावे नव्या प्रारुप मतदार यादीमध्ये समाविष्ट होऊ शकलेली नाहीत. गैरहजर, स्थलांतरित, मृत, दुबार नोंदणी किंवा गणना प्रपत्र भरून न देणे यांसारख्या विविध कारणांमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर नावे वगळली गेली आहेत. (how to check name in Maharashtra draft voter list)

तुम्ही महाराष्ट्रातील मतदार असाल, तर आगामी निवडणुकांसाठी मतदार यादीत तुमचे नाव कायम आहे की ते वगळले गेले आहे, हे तातडीने तपासणे अत्यंत आवश्यक आहे.त्यासाठी आयोगाकडून सोप्या स्टेप्स देण्यात आल्या आहेत.

प्रारुप मतदार यादी जाहीर: कशी तपासाल तुमची माहिती?

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे ३१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पुनरीक्षणापूर्वी राज्यात ९,७८,५४,०४९ एकूण मतदार होते. त्यापैकी ७,७१,६५,५६२ (७८.८६%) मतदारांचा समावेश सध्याच्या प्रारुप यादीत करण्यात आला आहे.

ही मतदार यादी निवडणूक आयोगाचे Voter Service Portal

https://voters.eci.gov.in/

https://voters.eci.gov.in

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे संकेतस्थळ

https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo

https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo

आणि सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मतदार यादीत नाव शोधण्याचे ३ सोपे पर्याय:

तुमचे नाव प्रारुप मतदार यादीत आहे की नाही, हे तपासण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर "Search Your Name in Draft ERoll of SIR 2026" हा पर्याय देण्यात आला आहे. तिथे खालील ३ मार्गांनी नाव शोधता येईल:

Search by EPIC: तुमचा मतदार ओळखपत्र (EPIC) क्रमांक टाकून थेट नाव शोधू शकता.

Search by Details: तुमचे राज्य, नाव, नातेवाईकाचे नाव, जन्मतारीख/वय, लिंग, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ निवडून माहिती तपासता येईल.

Search by Mobile: मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या OTP द्वारे नाव शोधता येईल.

वगळलेल्या मतदारांची यादी (ASDD List) कशी पाहावी?

ज्या मतदारांची नावे प्रारुप यादीत आलेली नाहीत, त्यांची यादी स्वतंत्रपणे "ASDD List (Absent, Shifted, Dead, Duplicate) SIR 2026" या मथळ्याखाली मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ही यादी तुम्ही EPIC क्रमांकाने किंवा तुमच्या मतदान केंद्राच्या (Polling Station Wise) यादीवरून (Download) थेट डाऊनलोड करून पाहू शकता.

नाव नसल्‍यास किंवा नवीन नाव नोंदवण्यासाठी काय करावे?

नाव वगळले असल्यास किंवा नवीन मतदारांसाठी: ज्यांचे नाव यादीत नाही किंवा १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या नवमतदारांना आपले नाव नोंदवण्यासाठी प्रपत्र-६ (Form-6) भरता येईल.

अर्जाची पद्धत: हे प्रपत्र त्यासोबतच्या घोषणापत्रासह https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर online पद्धतीने किंवा संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे (ERO) offline पद्धतीने जमा करता येईल. योग्य पडताळणीनंतर संबंधित मतदार नोंदणी अधिकारी अर्जावर निर्णय घेतील आणि पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट केली जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार

Raigad politics : खासदार सुनील तटकरेंना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का; सख्खे व्याही शिंदेंच्या शिवसेनेत

Maharashtra Weather : सावधान! पुढील २४ तास मुसळधार; विदर्भासह 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा थेट 'येलो अलर्ट'

बीड शहर हादरलं! न्यायाधीशांच्या निवासस्थान परिसरात दोन गटात फ्री-स्टाईल हाणामारी|Video Viral

Maratha Reservation:'मसुद्यावर भूमिका स्पष्ट करा, मगच पुढचा निर्णय'; सरकारचा जरांगेंना अल्टिमेटम

SCROLL FOR NEXT