sangli, maharashtra vadar samaj saam tv
महाराष्ट्र

Vadar Samaj Morcha : सरकारने मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार : महाराष्ट्र राज्य वडार समाज संघ

आज एकाच जिल्ह्यात माेर्चा काढला आहे आगामी काळात राज्यभरात काढू असा इशारा वडार समाजाने दिला आहे.

विजय पाटील

Sangli News : वडार समाजाच्यावतीने विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये आज (साेमवार) जिल्हाधिकारी कार्यालयावर भर पावसात धडक मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र राज्य वडार संघाच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील वडार समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. (Maharashtra News)

राज्यातल्या दुर्लक्षित असलेल्या वडार समाजाच्या विद्यार्थ्यांना, व्यक्तींना जातीचा दाखला आणि जात पडताळणी बाबत असणाऱ्या जाचक अटी मधून वडार समाजाला सवलत मिळावी यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी वडार समाजाच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

राज्य सरकारने भटका विमुक्त असणाऱ्या वडार समाजाच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावं अन्यथा या पुढील काळात तीव्र आंदोलन (aandolan) छेडण्यात येईल असा इशारा समस्त वडार समाजाकडून देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद पवार व सांगली जिल्हाध्यक्ष विनायक कलगुटगी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा (morcha) काढण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: Mumbai: पवई पोलिसांची अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई.

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT