Chandrapur Student Death Saam Tv
महाराष्ट्र

Shocking: नीटमध्ये 99.99 टक्के, मला डॉक्टर व्हायचं नाही, अ‍ॅडमिशनच्या दिवशीच आत्महत्या, चंद्रपूरमधील हृदयद्रावक घटना

Chandrapur NEET Student Death: चंद्रपूरमध्ये नीटच्या परीक्षेत ९९.९९ टक्क्यांनी उत्तीर्ण होऊन देखील विद्यार्थ्याने आत्महत्या केली. अ‍ॅडमिशनच्या दिवशीच त्याने आयुष्य संपवलं. या घटनेमुळे चंद्रपूरमध्ये खळबळ उडाली आहे.

Priya More

महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय विद्यार्थ्याने वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जाण्यापूर्वीच आत्महत्या केली. नीट परीक्षेमध्ये या विद्यार्थ्याला ९९.९९ टक्के गुण मिळाले होते. आपला मुलगा नीट परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे या विद्यार्थ्याच्या घरात आनंदाचे वातावरण होते पण वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वीच त्याने आयुष्याचा शेवट केला.

मिळालेल्या माहितीनुसार, अनुराग अनिल बोरकर (१९ वर्षे) असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव होते. मला डॉक्टर बनायचे नाही, असं सुसाईड नोटमध्ये लिहून त्याने आयुष्य संपवले. अनुराग सिंदेवाही तालुक्यातील नवरगावमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. त्याने नुकताच नीट परीक्षेत ९९.९९ टक्के गुण मिळवले होते. अनुराग ओबीसी श्रेणीमध्ये अखिल भारतीय रँक १४७५ मिळवला होता.

नीट परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर अनुराग एमबीबीएसच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी उत्तर प्रदेशमधील गोरखपूरला जाण्याची तयारी करत होता. गोरखपूरला जाण्यापूर्वीच अनुरागने राहत्या घरी आत्महत्या केली. घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळावर पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली.

अनुरागने सुसाइड नोटमध्ये नेमकं काय लिहिले हे पोलिसांनी अधिकृतरित्या सांगितले नाही. मला डॉक्टर व्हायचे नाही, असे अनुरागने सुसाइड नोटमध्ये लिहिले असल्याचे पोलिसांनी ऑफ रेकॉर्ड सांगितले. या प्रकरणाचा तपास सध्या नवरगाव पोलिस करत आहे. या घटनेमुळे चंद्रपूरमध्ये खळबळ उडाली आहे. अनुरागने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे कुटुंबीयांना देखील मोठा हादरला बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - मालेगावात भाजप-एमआयएमची छुपी युती; समाजवादी पार्टीचा आरोप

Sangli Politics: ऐन निवडणुकीत अजित पवारांना मोठा धक्का; उमेदवारावरच थेट हद्दपारीची कारवाई

ठाकरे कुटुंब आमचे मतदार, शिंदेंचा उमेदवार प्रचारासाठी थेट मातोश्रीवर, नेमकं काय घडलं? VIDEO

तेव्हा मी वेगळा निर्णय घेईन, नाराजी अन् पक्षबदलाच्या चर्चेवर मनसेच्या संदीप देशपांडेंचे सूचक विधान|VIDEO

प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने घेतला जगाचा निरोप; सिनेसृष्टीत शोककळा

SCROLL FOR NEXT