Nashik vani bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Nashik vani bus Accident: सप्तश्रृंगी गड बस अपघातांना मृतांना मदत जाहीर; पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी

Nashik vani bus Accident: सप्तशृंगी गड घाटातील एसटी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News: नाशिकमधील कळवण येथे सप्तशृंगी गड घाटातील एसटी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Latest Marathi News)

खामगाव आगाराची बस सप्तशृंगी गडावरून आज सकाळी खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट ४०० फुट दरीत कोसळली. बसमध्ये २२ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे.

जखमी प्रवाशांना वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींना प्राथमिक उपचार करून नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

पाच रुग्णांना नाशिक येथे हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

अपघात कसा झाला?

खामगाव आगाराची बस सप्तश्रृंग गडावरून खामगावला जाण्यासाठी निघाली होती. यावेळी बसमधून २० ते २५ प्रवासी प्रवास करीत होते. प्रवाशांनी भरलेली एसटी बस वणी गड उतरत असताना गणपती पॉईंटजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस थेट दरीत कोसळली.

नाशिकमध्ये घडलेल्या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर १८ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father shot: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर झाडल्या गोळ्या; २ तरुणांनी केला हत्येचा प्रयत्न

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

SCROLL FOR NEXT