Maharashtra State Lottery Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra State Lottery: महाराष्ट्र राज्य लॉटरी, फेब्रुवारीमधील सोडतींचा निकाल जाहीर

Maharashtra State Lottery News: महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात ५ मासिक सोडती काढल्या जात असून फेब्रुवारी-२०२४ मधील मासिक सोडती काढण्यात आलेल्या सोडतींचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra State Lottery News:

महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात ५ मासिक सोडती काढल्या जात असून फेब्रुवारी-२०२४ मधील मासिक सोडती काढण्यात आलेल्या सोडतींचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

यामध्ये ९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सहयाद्री, १६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी माघी गणपती, २० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र तेजस्विनी, २१ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र गौरव आणि २४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडतींचा समावेश आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यापैकी महाराष्ट्र सह्याद्री या विक्री झालेल्या तिकीटांमधून ३ हजार ३० तिकीटांना एकूण ७ लाख ५८ हजार ५० रुपये किंमतीची बक्षिसे जाहीर झाली आहेत. महाराष्ट्र गणेशलक्ष्मी माघी गणपती या सोडतीच्या विक्री झालेल्या १ हजार ६८६ तिकीटांना ८ लाख ७० हजार ५०० रुपये किंमतीची बक्षिसे जाहीर झाली आहेत. (Latest Marathi News)

महाराष्ट्र तेजस्विनी या सोडतीच्या विक्री झालेल्या ९३२ तिकीटांना ६ लाख १५ हजार ७०० रुपये किंमतीची बक्षिसे जाहीर झाली आहेत. महाराष्ट्र गौरव या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकीटांमधून ६ हजार ९८१ तिकीटांना ९ लाख २७ हजार किंमतीची बक्षिसे जाहीर झाली आहेत. महाराष्ट्र गजराज या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकीटांमधून २ हजार ५३३ तिकीटांना २ लाख ८९ हजार ४०० रुपये किंमतीची बक्षिसे जाहीर झाली आहेत.

लॉटरी तिकीट खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली प्रक्रिया पूर्ण करून रुपये १० हजारवरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेख) महाराष्ट्र राज्य लॉटरी वाशी कार्यालयाकडे सादर करावी. तर १० हजाराच्या आतील बक्षीस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death : नवी मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; पत्नीशी वादानंतर घरात आयुष्य संपवलं

Potato Recipe : बटाट्याला द्या चटपटीत ट्विस्ट, फक्त १० मिनिटांत बनवा 'ही' प्रसिद्ध चाट रेसिपी

Maharashtra Live News Update: नागरी वस्तीत शिरलेले पाणी ओसरायला सुरुवात

Actress No Makeup Look: ही क्यूट अभिनेत्री कधीच करत नाही मेकअप, लवकरच करणार 'रामायण'मध्ये काम

Mhada Konkan : म्हाडाच्या ७१ अनिवासी गाळ्यांचा ई लिलाव; नोंदणी अर्ज, बोली आणि निकाल कधी? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT