st bus news saam tv
महाराष्ट्र

ST Bus News : परिवहन मंत्र्यांनी मांडला पुढचा प्लान, एसटी महामंडळाच्या ताफ्यात वर्षाला आणणार ५००० लालपरी

st bus News update : एसटी महामंडळाने जाहिरातीसाठी उत्पन्नाचं उद्दिष्ट १०० कोटी रुपये ठेवले आहे. तसेच एसटी महामंडळ वर्षाला ५००० लालपरी खरेदी करणार असल्याची माहिती हाती आली आहे.

Saam Tv

मुंबई : एसटी महामंडळाबाबत महत्वाची माहिती हाती आली आहे. एसटी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या ५ हजार साध्या लालपरी खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी महामंडळाकडून अंतर्गत पंचवार्षिक नियोजन तयार करण्यात येणार आहे. यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडेतत्वावर बसेस न घेण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. तसेच उत्पन्नाचं ठराविक उद्धिष्ट देखील ठेवण्यात आलं आहे.

परिवहन आयुक्त कार्यालयात एसटी महामंडळाच्या कामकाजाची बैठक मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीसाठी एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

या बैठकीत परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, नवीन बस खरेदीचा करताना पुढील पाच वर्षात प्रवासी सेवेतून बाद होणाऱ्या बसेसचा विचार करण्यात यावा. तसेच सर्व बाबींचा अभ्यास करून पंचवार्षिक योजना आणावी. तसेच एस टी महामंडळात इलेक्ट्रिक बसेस घेण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक आगारामध्ये चार्जिंग स्टेशन प्राधान्याने उभारण्यात यावे'.

'महामंडळानं उत्पन्न वाढीसाठी पूरक योजना आणाव्यात. कर्मचाऱ्यांचं वेतन प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेपर्यंत देण्याची काळजी घेण्यात यावी. पगाराला कुठल्याही परिस्थितीत उशीर होता कामा नये. शासनाकडून महामंडळाला मिळणारा निधी आगाऊ स्वरूपात मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात याव्या, अशा सूचना त्यांनी दिल्या.

'एसटी महामंडळाने नवीन जाहिरात धोरण आणावं. नवीन येणाऱ्या बसेसवर दोन्ही बाजूला आणि मागील बाजूस अशा तीनही बाजूला डिजिटल जाहिरातीची व्यवस्था करण्यात यावी. जाहिरात धोरणासाठी अन्य बाबी तपासून घ्याव्यात. तसेच यामधून मिळणारे उत्पन्न १०० कोटीपर्यंत आणण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात यावं. महामंडळाच्या बसेसला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्यांवर टोल माफी मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा. तसेच डिझेलवरील व्हॅटमध्ये सवलत देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

एस टी महामंडळाच्या प्रत्येक डेपोमध्ये डिझेल पंप असून या पंपाचा व्यावसायिक दृष्टिकोनातून उपयोगी ठरतील असे डिझेल पंप सुरु करावेत. तसेच या पंपाचा उत्पन्न वाढीसाठी पर्याय निर्माण करण्यात यावा. याबाबत इंधन कंपन्यांची करार करावा, अशा सूचनाही परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:बारामतीत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आगमन; शारदा प्रांगणात मुक्काम

Palazzo Design for Monsoon: पावसाळ्या कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी पलाझो डिझाइन्स

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT