St Bus News: Maharashtra st bus fare hike mrstc hiked the ticket price of st buses during diwali news St Bus New and update - Saam tv
महाराष्ट्र

ST Bus Fare Hike: ऐन दिवाळीत प्रवाशांना फटका; एसटीने केली मोठी भाडेवाढ, जाणून घ्या किती?

ST bus fare Hike: एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने ऐन दिवाळीच्या गर्दी हंगामात १० टक्के भाडेवाढ केली आहे.

Vishal Gangurde

हिरा ढाकणे

ST Bus Fare Hike:

राज्यात गेल्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य लोक हैराण झाले आहेत. त्यानंतर आता त्यामध्ये आणखी एका दरवाढीची भर पडली आहे. एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने ऐन दिवाळीच्या गर्दी हंगामात १० टक्के भाडेवाढ केली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, एसटीने दरवर्षी प्रमाणे महसूल वाढीच्या दृष्टीने परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ सूत्रानुसार केली आहे. एसटीच्या या निर्णयानुसार, या दिवाळीच्या हंगामात आपल्या सर्व बस प्रकारच्या तिकीट दरात वाढ करण्यात येणार आहे. सर्व सरकारी बस प्रकारच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एसटीकडून ही भाडेवाढ ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजे ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान लागू राहणार आहे. त्यानंतर मूळ तिकीट दराप्रमाणे तिकीट आकारणी सुरू होणार आहे. तसेच, ज्या एसटी प्रवाशांनी आगाऊ तिकीट आरक्षित केले आहे. त्या प्रवाशांना तिकीटाची उर्वरित फरकाची रक्कम प्रत्यक्ष प्रवास करताना वाहकाकडे भरावी लागणार आहे.

दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येत्या ९ नोव्हेंबरपासून एसटीची जादा वाहतूक करण्यात येणार आहे. सणासुदीला गर्दीचा फायदा घेत खासगी बसचालक प्रवाशांकडून ज्यादा भाडे उकळतात. यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीच्या बसेस सोडण्यात येणार आहेत.

एसटी महामंडळाकडून होळी, गणेशोत्सव, दसरा-दिवाळी या सण-उत्सवात जादा वााहतूक चालवली जाते. यामुळे एसटीला अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : अणुशक्ती नगर मधून सना मलिक पिछाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT