10th Saam Tv News
महाराष्ट्र

Saam Exclusive : दहावीचा मराठीचा पेपर फुटला; उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना वाटल्या

Jalna ssc exam marathi paper leak : जालन्यातील बदनापूर येथे दहावीचा मराठीचा पेपर फुटला असल्याची माहिती समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

दहावी बोर्डाची परीक्षा आजपासूनच सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला. दहावीच्या परीक्षेला पेपरफुटीचं ग्रहण लागलं. दहावीचा पहिलाच मराठी विषयाचा पेपर फुटला. जालन्यातील बदनापूर शहरात दहावीचा मराठीचा पेपर फुटला असल्याची माहिती समोर आली आहे.

दहावीच्या मराठी पेपरच्या प्रश्नपत्रिकांवर उत्तरं असलेल्या प्रती विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्या. परीक्षा केंद्राबाहेरच्याच झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून त्या विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यात दहावीचा मराठीचा पेपर फुटला आहे. पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत हा पेपर फुटला आहे. जालन्यातील बदनापुरात हा पेपरफुटीचा प्रकार घडला आहे. परिक्षा केंद्राच्या बाहेर शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर उघड झालाय.

संपूर्ण राज्यात दहावीच्या बोर्डाती परीक्षा सुरू झाली आहे. वर्षभरापासून या परीक्षेसाठी विद्यार्थी तयारी करत होते. शुक्रवारी दहावीचा मराठीचा पेपर होता. परिक्षा सुरू असतानाच जालन्यातील बदनापूर शहरात एक धक्कादायक प्रकार घडला. जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात दहावीचा मराठीचा पेपर फुटला आहे. उत्तरांसहीत प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स अवघ्या २० रुपयांत विद्यार्थ्यांना विकल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर शिक्षण विभाग खडबडून जागं झालं असून, या प्रकाराची माहिती घेतली जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सकाळी दहावीचा मराठीचा पेपर होता. पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटात दहावीच्या मराठीची प्रश्नपत्रिका परिक्षा केंद्राच्या बाहेर आली. त्यानंतर झेरॉक्स सेंटरवर थेट उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मारून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा प्रकार समोर आलाय. २० रूपयात उत्तरपत्रिका विकली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बॉर्ड दहावीचा पेपर रद्द करणार की, नाही, कारवाई होणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT