शिक्षक, पदवीधर निवडणूक निकालाची अधिकृत आकडेवारी जाहीर; कोणत्या उमेदवाराला किती मते? वाचा एका क्लिकवर Saam Tv
महाराष्ट्र

शिक्षक, पदवीधर निवडणूक निकालाची अधिकृत आकडेवारी जाहीर; कोणत्या उमेदवाराला किती मते? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Legislative Council Election Results: महाराष्ट्रातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीची अधिकृत आकडेवारी जाहीर झाली आहे. पुणे, नागपूर, अमरावती आणि औरंगाबादमधील पाच मतदारसंघांत कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली?

Namdeo Kumbhar

Maharashtra MLC Election Result : महाराष्ट्रातील शिक्षक, पदवीधर निवडणुकीचा निकालाची अधिकृत आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जारी केली. अंतर्गत कलहामुळे महायुतीला पराभवाचा धक्का बसलाय. तर मविआने ३ जागा जिंकत सत्ताधाऱ्यांना जोरदार धक्का दिला आहे. पुणे आणि नागपूरच्या जागांवर शेवटपर्यंत अटीतटीची लढत झाली.

महाराष्ट्र विधान परिषदेतील औरंगाबाद विभाग पदवीधर, पुणे विभाग पदवीधर, नागपूर विभाग पदवीधर, अमरावती विभाग शिक्षक आणि पुणे विभाग शिक्षक या पाच मतदारसंघांमधील विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर, २०२६ रोजी संपुष्टात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पाच मतदारसंघांकरीता द्विवार्षिक निवडणुका घेण्यात आल्या. भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेने या सर्व पाच मतदारसंघासाठीचे निकाल घोषित करण्यात आले आहेत.

कोणत्या मतदारसंघात कुणाला किती मते?

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ :

विजयी उमेदवार: कौस्तुभ मुरलीधर गावडे (भारतीय जनता पार्टी) - २३१९७ मते

२ रा क्रमांक (लगतची मते मिळवणारे): सचिन नवनाथ सानप (अपक्ष) - १६३४७ मते

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ:

विजयी उमेदवार: किरण रामराव सरनाईक (शिवसेना) - १६६६३ मते

२ रा क्रमांक: अदिती ऋषिकेश पोहरे (इंडियन नॅशनल काँग्रेस) - ८६३६ मते

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ:

विजयी उमेदवार: हर्षदा देशमुख जाधव (नॅशनललिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार) - ११९३४० मते

२ रा क्रमांक: डॉ. स्मिता योगेश जाधव (भारतीय जनता पार्टी) - १०३१९२ मते

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ:

विजयी उमेदवार: अभिजित गोविंदराव वंजारी (इंडियन नॅशनल काँग्रेस) - ६७२३१ मते

२ रा क्रमांक: सुधाकर विठ्ठलराव कोहळे (भारतीय जनता पार्टी) - ६३१९६ मते

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ:

विजयी उमेदवार: डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील (नॅशनललिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार) - ८५८७६ मते

२ रा क्रमांक: चव्हाण सतीश भानुदासराव (नॅशनललिस्ट काँग्रेस पार्टी) - ६७७५२ मते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दररोज पाणी मिळणाऱ्या शहराला आता 8 दिवसांनी पाणीपुरवठा; श्रीरामपूरवर जलसंकट

Shocking : विरार हादरलं! बंद खोलीत आढळले ३ भावंडांचे मृतदेह; पोलिसांनी दरवाजा उघडला अन्...

Blood Pressure Medicine: ब्लड प्रेशरवरील औषधं घेण्याची योग्य वेळ कोणती? कार्डियोलॉजिस्टने सांगितली आश्चर्यचकित करणारी माहिती

Maharashtra News Live Update: दिल्लीत इंडिया आघाडीची प्रातिनिधिक संसद

Husband Health : नवरोबाच्या आरोग्याची किल्ली बायकोच्या हाती, 'हे' ५ नियम पाळायलाच हवेत

SCROLL FOR NEXT