MAHARASHTRA SCHOOL REOPENING 2026: VIDARBHA SCHOOLS TO OPEN ON JUNE 22, REST OF STATE FROM JUNE 15 saam tv
महाराष्ट्र

Maharashtra School Reopens: 15 जून की 22 जून? राज्यात कुठे-कधी सुरू होणार शाळा?

Maharashtra School Reopens: राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना हा निर्णय लागू आहे. राज्यातील शाळांना २ मे २०२६ पासून उन्हाळी सुट्टी देण्यात आली होती.

Bharat Jadhav

  • राज्यातील बहुतांश शाळा १५ जून २०२६ पासून सुरू होणार आहेत.

  • विदर्भातील शाळा वाढत्या उष्णतेमुळे २२ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय

  • २२ जून ते ३० जून दरम्यान विदर्भातील शाळा सकाळच्या सत्रात चालतील.

उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे शाळा सुरू करण्याच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता विदर्भातील शाळा २२ जूनपासून सुरू केल्या जाणार आहेत. विदर्भातील शाळा २२ जून ते ३० जूनपर्यंत सकाळच्या सत्रात सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिलेत. विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा १५ जून रोजी सुरू होणार आहेत.

राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी देण्यात आली होती. परंतु यंदा तापमानात कमालीची वाढ झाली होती. बहुतेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा ४२- ४४ च्या पुढे होता, त्यादृष्टीकोनातून शाळा उशिराने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

विदर्भातील तापमान लक्षात घेता राज्य शासनाने २२ जूनपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिलेत. विदर्भातील वाढते तापमान आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना हा निर्णय लागू करण्याचे आदेश दिलेत.

उष्णतेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन विशेष नियोजन करण्याचे पत्र पाठवण्यात आले आहे. 1 जुलै 2026 पासून शाळा नियमित वेळेनुसार सुरू होणार आहेत. उर्वरित महाराष्ट्रात 15 जूनपासून नियमित वेळेत शाळा सुरू राहतील, याबाबत प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी संयुक्त परिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली.

विदर्भात उष्माघाताने अनेकांचा मृत्यू झाला होता. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी हे सध्या देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले होते. काही दिवसांपूर्वीच ब्रह्मपुरीत नुकतीच ४७.२ अंश सेल्सिअस एवढ्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. परिणामी हवामान खात्याने अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला होता. पाऊस सुरू झाल्यानंतर कडाक्याच्या उष्णतेपासून सुटका होईल. परंतु विदर्भात मान्सून पोहोचण्यासाठी आणखी काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. परिणामी विदर्भातील तापमान विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने योग्य नसल्याचे निदर्शनास येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याण- डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात रात्रीपासून मुसळधार

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळ्यामागे १२६०० रुपयांची घसरण; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर

मोबाईल फोन १०० टक्के चार्ज करावा की नाही?

Nashik Crime: बायकोच्या छळाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या, खोलीचा दरवाजा उघडताच घरचे हादरले

Heart attack symptoms: 1 महिना अगोदर ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे!

SCROLL FOR NEXT