Sangli Politics 
महाराष्ट्र

Maharashtra Politics: जयंत पाटलांच्या सांगलीत अजित दादांची मोठी खेळी; ठाकरे गटासह भाजप 'क्लीन बोल्ड'

Sangli Politics: शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील याची पकड असलेल्या सांगली जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद वाढताना दिसत आहे. ठाकरे गट आणि भाजपला राष्ट्रवादीने दणका दिला.

Bharat Jadhav

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसने सांगलीत मोठी खेळी खेळत ठाकरे गट आणि भाजपला दणका दिलाय. अजित पवार यांच्या खेळीने जयंत पाटील यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. सांगलीमध्ये शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला वाढण्यास कोणतीच संधी दिली नव्हती. परंतु ठाकरे गट आणि भाजमधील नाराज आमदारांना हाताशी घेत राष्ट्रवादी पक्षाने कोंडी फोडलीय.

सरकारनामा या वृतसंस्थेच्या हवाल्यानुसार, अजितदादांची ताकद वाढण्याचा विढा निशिकांत पाटील यांना उचलला होता. चार आमदार अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झाल्याने निशिकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश आल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चार आमदारांचा पक्षात प्रवेश करून घेत जयंत पाटलांना होमग्राउंडवर धक्का दिलाय. सांगली जिल्ह्यात अजित पवार गटाकडे कोणताच चेहरा नव्हता. पण आता भाजप, ठाकरे गट शिवसेना, आणि शरद पवार गटात नाराज असलेल्या आमदारांना गळ घालत अजित पवार गटाने पाटलांना चेकमेट दिलाय.

नाराज आमदारांना घेरलं

ठाकरे गटातील माजी मंत्री शिवाजीरावर नाईक, शरद पवार गटातील माजी आमदार शिवाजीराव नाईक, भाजपमधील नेते आमदार राजेंद्र देशमुख यांना आपल्या पक्षात प्रवेश करून घेण्याचा निर्णय घेतलाय. पक्ष प्रवेशांच्या चर्चेला विलासराव जगताप यांच्याकडून दुजोरा देण्यात आलाय. सांगली जिल्ह्याच्या राजकारणात घोरपडे, जगताप, नाईक, देशमुख यांचा कायम दबदबा राहिलाय.

पण गेल्या काही वर्षात पक्षाकडून होणाऱ्या पक्षांतर्गत खच्चीकरण आणि गळचेपीमुळे हे नेते राजकारणातून बाहेर फेकले गेले होते. यामुळे ते पक्षात विरोधात नाराजी असल्याची चर्चा होती. त्यांच्या नाराजीचा फायदा घेत अजित पवारांनी त्यांना गळ घातलीय. हे नेते मोठ्या आणि राजकीय दृष्ट्या हक्काच्या पक्षाच्या प्रतीक्षेत होते. ती संधी त्यांना अजित पवार यांच्या गटाकडून मिळाली.

सांगली जिल्ह्यात चेहरा नव्हता

अजित पवार गटाला सांगली जिल्ह्यात कोणताच असा चेहरा नव्हता जो मतदारांना आकर्षित करेल आणि जयंत पाटील यांना आव्हान देऊ शकेल. विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांना शह देण्यासाठी निशिकांत भोसले-पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून घेण्यात आला होता. पण सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात आश्वासक चेहरा मिळाला नव्हता. भाजप, शिवसेना पक्षांवर नाराज होऊन बाहेर पडलेल्या घोरपडे, जगताप, नाईक, देशमुख यांना पक्षात घेण्यासाठी राष्ट्रवादी पक्षांकडून प्रयत्न सुरू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा, राष्ट्रपतींकडून मंजुरी, राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: आंदोलनामध्ये मारहाण करणे चुकीचे असे परत होता कामा नये-अमृता फडणवीस

IVF उपचार घेण्याच्या विचारात आहात? कोणत्या टेस्ट होतात, किती येतो खर्च?

जंतरमंतरच्या स्टेजवरच पोलीस कॉन्स्टेबलचा राजीनामा, VIDEO व्हायरल

कलम 324 च्या आडून तुम्ही मनमानी कराल का? SIR च्या ड्युटीवर शिक्षकांना नेमल्याने हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं

SCROLL FOR NEXT