Maharashtra Rain News Saamtv
महाराष्ट्र

Raigad Rain News: अवकाळी पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपलं, भात शेतीचे अतोनात नुकसान; बळीराजा संकटात

Maharashtra Rain News: हाता तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

Gangappa Pujari

सचिन कदम, प्रतिनिधी

Raigad Rain News:

एकीकडे दिवाळीची धामधुम सुरू असतानाच राज्यात अवकाळी पावसाची एन्ट्री झालीय. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काल राजधानी मुंबईसह, पुणे, ठाणे, कल्याण, रायगड तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. रायगड जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पाऊस कोसळत असून बळिराजाचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सलग चार दिवस झालेल्या अवकाळी पावसाने रायगडमधील (Raigad Rain) शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पावसामुळे कापलेल्या आणि कापणी योग्य भातपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. कापणी झालेले भाताचे भारे शेतातच पडून राहिल्याने भिजून गेले.

नुकसान कमी करण्यासाठी भिजलेले भाताचे पिक वाळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाताचे पिक हातात येण्याची वेळ असतानाच निसर्गाने दगा दिला आहे. हाता तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे दिवाळीच्या आनंदावर विर्जन पडले आहे. (Latest Marathi News)

. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, पुढील चार दिवसही अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार आहे. येत्या ४८ राज्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यासोबतच शेतकऱ्यांनी शेतीपिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देखील देण्यात आला आहे. (Maharashtra Rain Updates)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT