Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज; 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : जून महिन्यात राज्याकडे पाठ फिरवणाऱ्या पावसाने जुलै महिन्यात दमदार हजेरी लावली. जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला. तसंच शेती पिकाचंही मोठं नुकसान झालं. दरम्यान, येत्या ४ ते ५ दिवसांत मुंबई पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (Maharashtra Rain News Today)

मुंबई, पुण्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली होती. मात्र बुधवारी जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केलं.

अशातच जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. हवामान विभागाने जिल्ह्याला येलो आणि ऑरेंट अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनही सतर्क झालं आहे. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. (Rain In Maharashtra Tomorrow)

केरळमध्ये ४ ऑगस्टपर्यंत मुसळधार

दुसरीकडे केरळ्या अनेक भागात ४ ऑगस्टमपर्यंत मुसळधार पाऊस पडेल असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. मुसळधार ते अति मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, हवामान खात्याने आजही उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरसह अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली होती.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Update: राज्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस, कोणत्या जिल्ह्यांमध्ये घातलं अवकाळी पावसानं थैमान?

Pune Traffic News : पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; मेट्रोच्या कामामुळे 'या' भागातील रस्ते राहणार बंद

Nashik Lok Sabha Voting LIVE : नाशिकमध्ये मतदान सुरू होण्याआधीच EVM बंद, कर्मचाऱ्यांची तारांबळ

Narendra Modi: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात विक्रमी मतदान करा; पंतप्रधान मोदीचं मतदारांना आवाहन

Heavy Rain Alert : मान्सून अंदमानात दाखल होताच वातावरण बदललं; या भागात तुफान पाऊस कोसळणार

SCROLL FOR NEXT